दोन दिवसापूर्वी चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहुणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्या. – प्रहारची मागणी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : गेल्या दोन दिवसापूर्वी चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील केळी, संत्रा, पाणपिंपरी, निंबु पिकांची व ग्रामीण भागातील झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्वरित पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा अश्या मागणी चे प्रहार संघटनेच्या वतीने अंजनगाव सुर्जी येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन सादर करताना म्हटले की, गेल्या दोन दिवसापूर्वी आलेल्या मुसळाधार पावसाने तसेच चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या केळी, निंबू, संत्रा, पाणपिंपरी व इतर पिकाचे व ग्रामीण भागातील नागरिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडले, घरांची प्रचंड हानी झाली आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकऱ्यांचे, गाव खेड्यातील नागरिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी त्याकरिता लवकरात लवकर पंचनामे करून तत्काळ त्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी प्रहारचे शंभू मालठाणे (उपजिल्हा प्रमुख) सिद्दिकीभाई(युवा शहर प्रमुख),विवेक ठाकरे, बाळासाहेब रोंगे,वंसल बनाईत,निरंजन गांवडे,शंकर भगत,बाळा शेरकर,तौशिफ सौदागर,राहुल धानोरकर,ज्ञानदीप बारबे,राजेन्द्र शिरसकर,उमर अब्दुला,संदिप देशमुख इत्यादी कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते.

