ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

‘दि इंग्लिश हायस्कूल’मध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांचे बग्गीतून स्वागत!

 

 

 

नेर  : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला संस्मरणीय बनवण्यासाठी ‘दि इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय’ येथे नवागत विद्यार्थ्यांचे बग्गीतून जल्लोषात स्वागत करत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचवी इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना बग्गीतून शाळेच्या परिसरात नेऊन पुष्पगुच्छ, शालेय पुस्तके आणि सुकामेवा देण्यात आला. शाळेच्या गौरवशाली वाटचालीची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता निर्माण  करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी व पालकांनी आनंदाने छायाचित्रे टिपली.

या विशेष कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित!

या विशेष कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे, शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जाधव, साधन व्यक्ती रिजवान शेख, पालक प्रतिनिधी डॉ. प्रशांत पेटकर आदी मान्यवर उपस्थित होते. बग्गीतून उतरल्यानंतर इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मनोहारी मानवी मनोऱ्याच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांना  वर्गांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रशांत बुंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनंत हिरुळकर व रश्मी बोभाटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. हिरुळकर यांनी केले. शिक्षक हितेश श्रुंगारे, शकुंतला कोकाटे, अजय कारभारी, शीतल पाडेकर यांनी परिपाठ सादर केला. शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.