ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा CBSE पॅटर्न नुसार थाटात प्रवेशोत्सव!

जिल्हा परिषद शाळेत नवागतांचे स्वागत!

मानोरा : शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शासनाच्या आदेशानुसार आता जिल्हा परिषद शाळेतसुद्धा सी बी एस ई पॅटर्न नुसार अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. मानोरा पंचायत समिती, विठोली केंद्र अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मौजे आसोला खुर्द येथे यावर्षी इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे वाजतगाजत पुष्पगुच्छ, फुगे व आवडीच्या वस्तू देऊन त्यांचे आनंदाने जंगी स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत योजनेनुसार इयत्ता निहाय पाठ्यपुस्तके व गणवेश वितरित करण्यात आले.

गावात विद्यार्थ्यांची शालेय प्रवेशोत्सव प्रभात रॅली!

सर्वप्रथम संपूर्ण गावात विद्यार्थ्यांची शालेय प्रवेशोत्सव प्रभात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणा देत गाव परिसर दणाणून सोडला होता. गावच्या विकासासाठी व व्यक्तीच्या वैचारिक पातळीवर विकास होण्यासाठी शालेय शिक्षण खुप आवश्यक आहे, आपल्या गावातील शाळेत प्रत्येक मूल शिकावे यासाठी आमच्या गावातर्फे शाळेला आवश्यक ते संपूर्ण सहकार्य असेल, अशा प्रकारे मनोगत दिपक राठोड यांनी व्यक्त केले.

शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आले. यावेळी राजकुमार राठोड म्हणाले की, शाळेला आवश्यक भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या  गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य ग्रामस्थांचे राहील. मुख्याध्यापिका अनिता गाढवे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी  हार्दिक शुभेच्छा दिल्या. आता आपल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेली सर्व मुले देशाचे भवितव्य ठरणार आहेत. आपल्या शाळेतील शिकणारी मुले पुढे चालून भविष्यात डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक होतील कारण आपल्या शाळेत शिकवणारे शिक्षक हे तज्ञ मार्गदर्शक आहेत, त्याचा लाभ नक्कीच शाळेतील विद्यार्थ्याला होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत कार्यक्रम यशस्वी!

यावेळी गावातील ग्रामस्थ, उत्साही पालक, मान्यवर उपस्थित होते. प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक सुरेश वाघमारे, शंकर भड, रामेश्वर बेहरे, नारायण लावरे, सुरेश मांजरे, सुनीता सरनाईक, सुरेश चव्हाण यांनी प्रभावी नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिक्षक शंकर भड यांनी केले तर शाळेच्या मुख्याध्यापक अनिता गाढवे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. अशाप्रकारे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत आणि प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.