ताज्या घडामोडीमहत्वाचेमहाराष्ट्र

मिसिंग लिंकच्या कामाची पारदर्शक चौकशी करा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

माझी मागणी आहे की, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची चौकशी व्हायला पाहिजे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, असं यावेळी त्यांनी सांगितलंय.

पुणे : राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत, तर काही ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) तसेच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलीय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, मिसिंग लिंकबाबत सुरुवातीला जे व्हिडीओ येत होते, ते सुरुवातीला मला एआय व्हिडीओ वाटले होते. मला विश्वास बसत नाही की, ज्या मिसिंग लिंकचा एवढा मोठा कार्यक्रम झाला, त्याचं आम्ही देखील कौतुक केलं. पण ज्या पद्धतीने आता व्हिडीओ येत आहेत ते अतिशय चिंताजनक असून, एवढा पाऊस या आधी झालेला असताना राज्यात अशी स्थिती का झाली? हे खूपच चिंताजनक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा आणि जे काही सत्य आहे ते त्यांनी सांगावं. माझी मागणी आहे की, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची चौकशी व्हायला पाहिजे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल, असं यावेळी त्यांनी सांगितलंय.

पावसामुळे मुंबई पुण्यातील रस्ते तसेच ट्रेन देखील बंद : बारामती लोकसभा मतदारसंघातील तसेच पुणे शहरातील विविध विषयांच्या संदर्भात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेतली. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पावसामुळे मुंबई पुण्यातील रस्ते तसेच ट्रेन देखील बंद आहेत. तसेच दरड कोसळल्याच्या बातम्या अनेक ठिकाणांहून येत आहेत. काही ठिकाणी झाडं पडली आहेत तर काही ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. मिसिंग लिंकबाबत सुरुवातीला जे व्हिडीओ येत होते, ते सुरुवातीला मला एआय व्हिडीओ वाटले. मला विश्वास बसत नाही की, ज्या मिसिंग लिंकचा एवढा मोठा कार्यक्रम झाला, त्याचं आम्ही देखील कौतुक केलं. पण ज्या पद्धतीने आता व्हिडीओ येत आहेत ते अतिशय चिंताजनक असून, एवढा पाऊस या आधी झालेला असताना राज्यात अशी स्थिती का झाली आहे हे खूपच चिंताजनक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा आणि जे काही सत्य आहे ते त्यांनी सांगावं. माझी मागणी आहे की, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची चौकशी व्हायला पाहिजे आणि याच उत्तर सरकारला द्यावं लागेल, असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

कनेक्टिव्हिटी बंद असणे हे खूपच धक्कादायक : त्या पुढे म्हणाल्या की, सुरक्षिततेबाबत कोणीही विचार करत असून, राज्यात अनेक कामे सुरू आहेत. पण कनेक्टिव्हिटी बंद असणे हे खूपच धक्कादायक आहे. लोकप्रतिनिधी जर अधिवेशनाला जाऊ शकत नसेल तर हे खूपच चिंताजनक आहे. आज पुणे मुंबईला जाणारे सर्व रस्ते बंद झालेत. एका पावसात महाराष्ट्र पॅरलाइझ झाला आहे. एवढे प्रोजेक्ट करताना पर्यावरणाचा विचारच सरकारने केलेला नाही. सत्तेमधील लोक 70 वर्षांच्या हिशेब मागतात, पण यांच्या 12 वर्षांचा हिशेब कोण देणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचंच सरकार आहे. जाब तर विचारायला लागेल. पक्ष आणि घर फोडायचे पाप सातत्याने होत आहे, यासाठी सरकारला वेळ आहे, असंही यावेळी सुळे म्हणाल्या.

अयोध्या आणि उज्जैन हा आमच्यासाठी आस्थेचा विषय : अयोध्या येथील राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणाबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, निलेश लंके यांची इच्छा आहे की, अयोध्येत जाऊन आंदोलन करायचे. मात्र तिथे परवानगी देत नाही, अशी परिस्थिती आहे. तिथून लोकांना काढलं जात आहे. अयोध्या आणि उज्जैन हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. राम मंदिरासाठी भाजपाच्या काही लोकांनी किती संघर्ष केला, त्यांना काय वाटत असेल हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यात भ्रष्टाचार होत आहे. आम्ही हे सहन करणार नाही, असंही यावेळी त्यांनी सांगितलंय.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.