ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

टीमटाळ्याचे रेल्वे फाटक सारखे बंदच; वाहनचालक त्रस्त

बडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानका पासून नागपूर रेल्वे मार्गाने टीमटाळा रेल्वे स्थानकानजीक रेल्वे फाटक सारखे बंदच असते. या मार्गावर दिवसभरातून सर्वच प्रकारच्या जवळपास शंभर रेल्वे गाड्या धावत असतात. अमरावती जिल्ह्यातील रेल्वे फाटकांच्या ठिकाणी बहुतांश अंडरपासची कामे सुरू आहेत. सध्या तरी नागरिकांसाठी ती डोकेदुखीच ठरत असल्याचे म्हणावे लागेल.

अमरावती, नरखेड, नागपूर रेल्वे मार्गाने बरीच रेल्वे फाटके आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच महाराष्ट्र ‘रेल्वे फाटकमुक्त’ करू अशी घोषणा केली. जिल्ह्यात सर्वच मार्गावर काही ठिकाणी अंडरपास, तर कुठे उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. येणाऱ्या दोन वर्षात ही सर्व कामे पूर्णत्वास जातील, असे सांगण्यात आले. तूर्तास रेल्वे फाटकांवरील जामचा त्रास नागरिकांना डोकेदुखीच ठरतो आहे. रेल्वे फाटकाच्या ठिकाणी सुरू असलेली कामे अत्यंत धीम्या गतीने सुरू आहेत. या कामांना गती देणे गरजेचे आहे.

कधी अंत्ययात्रा खोळंबते, तर कधी अॅम्ब्युलन्स..

सर्वच रेल्वे फाटकांवर अॅम्ब्युलन्सची चांगलीच फजिती होत असते. अनेकदा अॅम्ब्युलन्स रेल्वे फाटकांच्या गर्दीत अडकून पडतात. त्याचप्रमाणे अंत्ययात्रांनादेखील बराच वेळपर्यंत थांबून राहावे लागते.

अकोली रोडवरील फाटकावर असते गर्दी..

नया अकोला रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या अकोली रेल्वे फाटकावर बरीच गर्दी असते. या मार्गावर रेल्वे गाड्या कमी असल्या तरी हे फाटक शहरी भागातील आहे.

पाच वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू…

अमरावती रेल्वे मार्गाने जुन्या वस्तीपासून जवळच असलेल्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी तब्बल पाच वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या रेल्वे फाटकावर नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. कामाला गती देणे आवश्यक आहे.

हे रेल्वे फाटक सर्वात मोठी डोकेदुखी…

टीमटाळा जवळचे फाटक असते बंदच…

नागपूर रेल्वे मार्गावरील टीमटाळा रेल्वे स्थानकाजवळील फाटक सारखे बंदच असते. या मार्गावरून दिवसभरात शंभर गाड्या धावतात.

गोपालनगर रेल्वे फाटकावर असतो जाम..

बडनेरा ते अमरावती रेल्वे मार्गावरील गोपाल नगर स्थित रेल्वे फाटकावर वाहनांची लांबच लांब रांग असते.

 

जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम झपाट्याने करावे तसेच या ठिकाणी अंडरपास करण्यात यावे.

मुकुंद वानखडे, नागरिक.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.