ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

एसटी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकली ; चांदूर तालुक्यातील घटना, सात प्रवासी जखमी

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे एसटी आगाराची बस बेलोरा या गावी जात असतांना चिंधादेवी फाट्याजवळ अनियंत्रित होऊन निंबाच्या झाडाला धडकल्याची घटना शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान घडली. यामध्ये ड्रायव्हर, कंडक्टर एकूण सात लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सातही जखमींना चांदूर रेल्वे वरून अमरावती रेफर करण्यात आले. तर बस मधील इतर काही प्रवासी किरकोळ जखमी आहे. बस समोर रोही आडवा आल्याने सदर अपघात झाल्याचे बोलल्या जात आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.