आरोग्यताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

गणेश नगर प्रभागात डास निर्मूलन फवारणी त्वरित करा

अन्यथा... तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :
एकीकडे देशात तसेच राज्यात शासनाच्या वतीने “स्वच्छ भारत अभियान” मोठ्या गाजावाजा करीत राबविण्यात येत असुन, मात्र अंजनगाव सुर्जी शहर हे यात अपवाद ठरत आहे. स्वच्छ अभियानासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देतो मात्र हा निधी गुलदस्त्यात राहते.शहरातील गणेश नगर प्रभाग क्रमांक २ या परिसरात गेल्या एक वर्षांपासून नगर परिषद कार्यालय तथा आरोग्य विभागाच्या वतीने डास निर्मूलन व किटकनाशक औषधी फवारणी झालेली नसुन, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ठिक-ठिकाणी पावसामुळे गवता सह पाण्याचे डबके गटार साचलेले आहेत, यामुळे या डबक्यांत डासांचा तसेच विषारी किटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असुन, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कित्येकदा नागरिकांनी प्रशासनाला कळविले असता याकडे न.प प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याकरिता स्थानिक परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ता उमेश चौखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देत फवारणी करण्याची मागणी केली आहे. जर आठ दिवसांच्या आत नगरात औषधी फवारणी न झाल्यास लोकशाही मार्गाने नगर परिषद कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ता उमेश चौखंडे यांनी निवेदन देतेवेळी दिला. यावेळी
उमेश चौखंडे यांच्यासह विजय कात्रे, पंकज हिरुळकर, यश डिके, प्रणय किरक्टे, जितु गावंडे, सुशांत चौखंडे, अनिकेत काळे, पवन ढगे, अमोल फाटे, विलास वाघमारे तथा समस्त गणेश नगरवासी प्रामुख्याने उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.