अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालय अधीक्षकाची उचल बांगडी

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : येथील ग्रामीण रुग्णालय हे सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने या ठिकाणी आदिवासी बांधव तसेच गोरगरीब नागरिक आपले इलाज करण्याकरिता रुग्णालयात येतात परंतु त्यांना औषध उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने तर काही रुग्णांना औषधे मिळत नसल्याने रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने एवढेच नाही तर तक्रार करते यांनी म्हटले की येथील मेडिसिन सुद्धा आपल्या खाजगी रुग्णालयात वापरत असल्याचे सांगितले .तसेच डॉ. हजर सुद्धा राहत नसल्याने राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विठ्ठल खाडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली .त्यावर ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे जिल्हाचौकशी समिती दिनांक ८.७२०२५ रोजी चौकशी समिती चा अहवाल तयार करण्यात आला त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथून प्रशासकीय अडचणीमुळे ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे त्यांना सेवा वर्ग देण्यात आला होता करिता संदर्भीय चौकशी अनुसंगाने डॉ अमोल नालाट अधीक्षक अंजनगाव सुर्जी सेवा वर्ग त्यांना आपल्या मूळ स्थापनेच्या ठिकाणी दर्यापूर येथे रुजू होण्याबाबत दिनांक २१.७.२०२५ ला अंजनगाव ग्रामीण रुग्णालयातून कार्यमुक्त केले करिता त्या ठिकाणी त्यांनी रुजू व्हावा तसा अहवाल त्यांना देण्यात आला व ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे डॉ. सुरेंद्र कुमार ढोले वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय अचलपूर यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक व चौकशी समिती यांचे तक्रार करते व काही नागरिकांनी आभार व्यक्त केल्याची चर्चा अंजनगाव सुर्जी परिसरात असल्याचे दिसत आहे.

