ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
अंजनगाव सुर्जी येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार श्री सुरज बोंडे यांचे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघा तर्फे स्वागत

सचिन इंगळे/अंजनगाव सुर्जी : अंजनगाव सुर्जी येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुरज बोंडे यांचे स्वागत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार मंडळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना सुरज बोंडे यांनी सांगितले की, येणाऱ्या सण उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये याची दक्षता अंजनगावच्या नागरिकांनी घ्यावी. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता घ्यावी. असे आव्हान नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुरज बोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
यावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे ,तालुका अध्यक्ष कुशल चौधरी, शहराध्यक्ष अब्दुल रहेमान ,जिल्हा सचिव मनोज मेळे,अमानत उल्ला खॉ, अब्दुल शाहिद, मंगेश इंगळे उपस्थित होते.

