सामाजिक उपक्रमाने संगीता गोविंद मेण यांचा वाढदिवस साजरा

— सचिन इंगळे (प्रतिनिधी)अंजनगाव सुर्जी :
सामाजिक कार्यकर्त्या
पंतजली जिल्हा संघटन मंत्री व लोकजागर
संगीता गोविंद मेण यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन पंतजली योग समिती व लोकजागर परीवाराचे वतीने करण्यात आले होते.पर्यावरण प्रेमी व योगक्षेत्रात व विविध सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.या अनुषंगानेच संगीता मेन यांच्या वाढदिवसानिमित्त विवीध ठिकाणी झाडांचे वृक्षारोपण व झाडांचे वाटप करण्यात आले.
विविध प्रकारचे बहुउपयोगी झाडांचे भेट बहुसंख्य लोकांना देण्यात आली.व विविध ठिकाणी, प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .
संगीता बहुसंख्य झाडांचे वाटप वाढदिवसाच्या निमित्ताने केले.
या कार्यक्रमाला लोकजागरचे आनंददादा संगई, पोलिस प्रशासन कर्मचारी ढोलेसर, डॉ.कौस्तुभ पाटील सर,देवानंद दादा महल्ले, संजय धारस्कर नानाभाऊ शिंदीजामेकर सुधीर गायगोले निता मोगरे अनु हिवरे,शोभा थोरात,सोनु सातपुते,ज्योती अंधारे,देवानंद माकोडे,दिपा घाटे,सारीका घामोळे,निता बोचरे,संतोषभाऊ गोलाईत, महादेव भाऊ बाळे,दिपक पिंगे,माहुलकर सर,यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला पंतजली योग समिती भेलांडेसर, भास्कर राव बोंद्रे सर, गजानन सहारे सर व मोठी मढी महीला योग वर्ग व विविध संघटनेचे वतीने शुभेच्छा दिल्यात.
संगीता गोविंद मेण यांनी सर्वाचे आभार मानले.

