मिल कामगारांनी चिमणीवर चढून काढली तिन रात्र

अचलपूर : येथील फिनले मिलमधील कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन व बोनस देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी फिरविल्याने कामगारांनी मिलच्या चिमणीवर चढून अख्खी रात्र काढली. बोनस मिळेपर्यंत खाली उतरणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्ते कामगारांनी दिला आहे.
मे महिन्यात आंदोलन सुरू करताना तीन महिन्याचे वेतन आणि बोनस देण्याचा घेतलेला निर्णय अधिकाऱ्यांनी फिरविला. मुंबईत मंगळवारी गेलेल्या आंदोलनकर्त्यांना पाहून अधिकाऱ्यांनी पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुरुवारी सायंकाळी ५ वाजतापासून पुन्हा मनोज सूर्यवंशी व विवेक उघडे या दोन आंदोलनकर्त्यांनी उंचच उंच चिमणीवर चढून आंदोलन सुरू केले. आता खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय उतरणार नाही असा इशारा दिला. देशात एकमेव नफ्यात असलेली फिनले मिल मागील आठ वर्षांपासून बंद करण्यात आली. दरम्यान अनेक कामगारांचा अपघाती मृत्यू झाला.
काहींनी आत्महत्या करून जीवन संपविले. तीन महिन्याचे वेतन आणि बोनस देण्याच्या मागणीसाठी २७ मे रोजी सुरू झालेले आंदोलन २९ मे रोजी लेखी आश्वासनाअंतिम मागे घेण्यात आले होते. त्यावेळीही मनोज रामसिंह सूर्यवंशी व निकेश उघडे या दोन कामगारांनी चिमणीवर चढून बसले होते. अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे व पदाधिकाऱ्यांनी फिनले मिलच्या मुंबई व दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी बोलून लेखी आश्वासन प्राप्त केले. तरी तीन महिने होऊनसुद्धा कामगारांना वेतन व बोनस दिले गेले नाही. दिल्ली, मुंबईला अनेकदा बोलावून बोळवण केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या घटनाक्रमामुळे मिल कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चिमणीवर बसून काढली रात्र मे महिन्यातसुद्धा अवकाळी पावसात दोन रात्री चिमणीवर चढून काढल्यानंतर कामगारांच्या पदरी आश्वासनाशिवाय काहीही पडले नाही. त्यामुळे पुन्हा बोनस व तीन महिन्यांचे वेतन मिळावे यासाठी दोन कामगार चिमणीवर चढून आंदोलन करीत आहेत. त्यांनी चिमणीवर बसून रात्र काढली.
महाप्रबंधक अमित कुमार सिंग अजूनपर्यंत आले नाहीत. जोपर्यंत बोनस होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. एनटीसीचे लेखी लेटर फिनले मिल कामगारांना देण्यात येते. ७० कोर्टीचा माल विकल्या जाते. इंदू, टाटा, पोतदार येथील कामगारांना बोनस देण्यास येते तर इथल्या कामगारांना का नाही. ३८ कोर्टीचे टेंडर पास झाल्यावर सुद्धा इथल्या कामगारांना बोनस देण्यात आले नाही.
राजा ठाकूर फिनले मील कामगार कार्यकर्ता.

