शेतकऱ्यांना मिळणार हक्काची कागदपत्रे – अंजनगाव सुर्जी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जनसंवाद कार्यक्रम

-सचिन इंगळे अंजनगाव सुर्जी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, महसूल व वनविभाग तसेच तहसील कार्यालय सेवा पंधरवडा मोहीम अंतर्गत अंजनगाव सुर्जी येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते शेतकरी बांधवांना उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. यावेळी आमदारांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामुळे शेतकरी बांधवांना जमिनीचे हक्क, उत्पन्नाचे दाखले व आवश्यक कागदपत्रे सोप्या पद्धतीने मिळणार आहेत. शासनाने महसूल व वनविभागाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.”
कार्यक्रमाला तहसिलदार श्रीमती पुष्पा सोळंके (दाभेराव), माजी आमदार रमेश बुंदिले, कृषी अधिकारी जाधव मॅडम, नायब तहसीलदार भगत साहेब, पुरवठा अधिकारी रामाघरे साहेब, सहाय्यक कृषी अधिकारी वसुकर साहेब, तसेच महेंद्र दीपटे, प्रमोद दाळू, राजू अकोटकर, विलास कविटकर, गोपाल चंदन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
तहसिल कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजर होते.

