स्वस्थ नारी–सशक्त परिवार अभियानांतर्गत भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

-सचिन इंगळे (प्रतिनिधी)अंजनगाव सुर्जी : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत स्वस्थ नारी–सशक्त परिवार या अभियानांतर्गत अंजनगाव सुर्जी येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार गजानन लवटे व तहसीलदार पुष्पाताई सोळंके यांच्या हस्ते झाले.
या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात जवळपास 30 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी जीवनदायी योगदान दिले. तर आरोग्य शिबिरात तालुक्यातील सुमारे 250 महिलांनी सहभागी होत विविध तपासण्यांचा लाभ घेतला. महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय, स्त्रीरोग व इतर आजारांच्या तपासण्या करून देण्यात आल्या. या तपासण्यांमुळे महिलांच्या आरोग्याविषयी जनजागृती होऊन त्यांना आवश्यक वैद्यकीय सल्ला व औषधोपचार मिळाले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ तरूण पटेल, डॉ तराळ, डॉ प्रीती दुबे, सुरेश गावंडे, स्वाती सोनवणे, डॉ गिरीश, डॉ शुभम, डॉ कविता, डॉ सोनाली, ब्लड बँक युनिट धारणी तसेच उपजिल्हा रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथील डॉ रेखाते, डॉ टांक, डॉ साकिब शेख, डॉ बिहाडे, डॉ मोहोळ, डॉ काकड या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांनी परिश्रम घेतले. त्यांनी रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन मंगेश पाटणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुवर्णा बिहाडे यांनी केले. ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथील अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम भव्यदिव्य आणि यशस्वीरीत्या पार पडला.
या अभियानामुळे आरोग्य तपासणी व रक्तदानाबद्दल जनतेमध्ये उत्साह निर्माण झाला असून महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढीस लागली आहे.

