महाराष्ट्र

“एनसीसी परेडमध्ये अंजनगावचा गौरव – प्रियल धांदेचा अभिमानाचा क्षण”

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : स्थानिक राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगाव सुर्जी येथील एनसीसी विभागातील प्रतिभावंत छात्रा कु. प्रियल धांदे यांनी केवडिया, गुजरात येथे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांचा १५० वा जयंती राष्ट्रीय एकता दिवस निमित्त आयोजित केलेल्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेवरील एनसीसी परेडमध्ये भाग घेतला. ही भव्य परेड दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाली.

कु. प्रियल धांदेने या परेडमध्ये सहभाग घेण्यासाठी विविध निवड चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या, ज्यानंतर तिला परेडमध्ये सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिला उत्कृष्ट कौतुक केले. तसेच महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. बशिष्ठ चौबे यांनी तिचा विशेष सत्कार करून तिच्या या उपलब्धीचा गौरव केला.

सत्कार समारंभात प्रा. डॉ. सत्येंद्र गडपायले यांनी एनसीसी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले तसेच त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी एनसीसी अधिकारी श्री. अनिल ताडे, श्री. हर्षकुमार चंदनपत्रि, महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व एनसीसी छात्र-छात्रांची उपस्थिती होती.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.