ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

कृषीच्या ‘त्या’ लिपिकाची हत्या अनैतिक संबंधातून

मोर्शी पोलिसांनी २४ तासांच्या आत केले गजाआड, कबुलीही

मोर्शी : स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या खुल्या जागेवर कृषी कर्मचारी विनोद भास्करराव राऊत (५२, रा. समर्थ कॉलनी) यांचा मृतदेह २३ ऑक्टोबर रोजी रात्री आढळला होता. त्यांचा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली त्यांच्याच कार्यालयातील सुरक्षारक्षकाने पोलिसांना दिली.

धनराज सुखदेव वानखडे (५२, रा. घाटलाडकी, ता. चांदूर बाजार, ह.मु. श्रीकृष्णपेठ, मोर्शी) असे अटक आरोपीचे नाव आहे. विनोद राऊत यांचा मुलगा तेजस (२४) याने असा झाला घात विनोद यांचे त्यांच्याच कार्यालयात गार्ड असलेल्या धनराज वानखडे याच्या नातेवाईक महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्याच्या मनात राग धुमसत होता. त्यामुळे त्याने संधी साधून विनोद राऊत यांना एकट्यात गाठले आणि लोखंडी सळाखीने बेदम मारहाण करीत त्यांचा जीव घेतला. ठाणेदार राहुल आठवले यांनी अल्पावधीत प्रकरणाची यशस्वी उकल केली. याप्रकरणी फिर्याद दाखल केली. चांदूर बाजार तालुका कृषी कार्यालयातील लिपिक विनोद राऊत हे २३ ऑक्टोबर रोजी सकाळी लोन केसच्या कामाकरिता अमरावती येथे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला होता.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.