ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

‘कारगिल’ मंडळाचा परवाना रद्दचा प्रस्ताव कलेक्टरांकडे?

फ्रेजरपुरा हद्दीत भरगच्च जुगार : १५ जण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाईत

अमरावती : क्रीडा व मनोरंजन क्लबच्या आड एक्का बादशहाचा जुगार अड्डा चालविणाऱ्या दोघांसह १३ जुगाऱ्यांना ‘टीम क्राइम’ने ताब्यात घेतले. २३ ऑक्टोबर रोजी फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील प्रशांतनगर चौकात ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना त्या अवैध धंद्यांबाबत माहिती मिळाली होती.

प्रशांतनगरस्थित कौसल्या सदनमधील कारगिल क्रीडा व मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष रमेशचंद्र गारोडे व उपाध्यक्ष अरविंद मनवर हे त्यांच्या मनोरंजन क्लबमध्ये सभासदांव्यतिरिक्त इतर इसमांना बोलावतात. तेथे अवैध जुगार खेळवत असल्याची माहिती टीम क्राइमला मिळाली. त्याआधारे गुरुवारी रात्री तेथे धाड घालण्यात आली. त्यावेळी तेथे काहीजण गंजीपत्यावर क्वाइनच्या माध्यमातून पैशांची बाजी लावत जुगार खेळताना दिसून आले. तेथून मनोरंजन क्लबचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह १५ जणांना ताब्यात घेतले. तेथून जुगाराचे नगदी ५९ हजार ५०० रुपयांसह १ लाख ४३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

यांना घेतले ताब्यात रमेशचंद्र गारोडे (रा. प्रशांतनगर), अरविंद मनवर (भीमटेकडी), रोशन नकाशे (रा. नवी वस्ती, बडनेरा), तन्मय वानखडे (किशोर नगर), नितीन वडे (रा. साईनगर), विलास मानमोडे (रा. अंबागेट), विवेक देशमुख (रा. मंगलधाम कॉलनी), विलास देशमुख (रा. काँग्रेस नगर), आशिष चक्रवर्ती (रा. पुष्पक कॉलनी), बशीर घसीटा रायलीवाले (रा. गवळीपुरा), चेतन वानखडे (प्रशांत नगर), विष्णू काळे (महादेव खोरी), अमेय येऊतकर (प्रशांतनगर), अर्जुन सूर्यवंशी (रा. छाबडा प्लॉट) व निरंजन वानखडे (संकेत कॉलनी) यांना तेथून ताब्यात घेण्यात आले.

 

खुलेआम जुगार; फ्रेजरपुरा पोलिस अनभिज्ञ कसे?

पोलिसांनुसार, गेल्या दोन वर्षापासून कारगिल क्रीडा व मनोरंजन मंडळात मनोरंजनाच्या आड जुगार खेळविला जात होता. विशेष म्हणजे, फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन कुख्यात जुगारचालकांच्या अड्ड्यांनाही लाजवेल, त्यापेक्षाही खुलेआम पद्धतीने तेथे जुगार खेळविला जात होता, असे कारवाई पथकातील अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदारांपासून त्या मनोरंजन कम जुगार अड्ड्याची माहिती खुपियाने दडविली की जुन्या डीबी स्कॉड प्रमुखाने ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.