महत्वाचे

“२१ वर्षांनंतर जुने विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा एकत्र — प्रागतिक विद्यालयात स्नेहसंमेलनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला”

  • -सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : शहरातील प्रागतिक शिक्षण संस्था संचालित प्रागतिक विद्यालयात माजी विद्यार्थी व शिक्षकांचा भव्य स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. तब्बल 21 वर्षांनंतर जुन्या मित्रमैत्रिणींशी झालेल्या भेटीत आनंद, हशा आणि गोड आठवणींचा दरवळ पसरला होता.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. स्वागत गीतानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर शिक्षकांनी शालेय काळातील प्रसंग सांगत भावनिक आठवणींना उजाळा दिला.

संमेलनाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी स्व. स्वप्नील बाळे, स्व. सुषमा धर्मे आणि स्व. रितेश कावरे या माजी विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी मा. श्री. सुधाकरराव तिखिले, चंद्रशेखर मेन, दिनकरराव धमाले, भाऊराव माहुलकर, मंदाताई तायडे (वानखडे), रमेश मेश्राम, रमेश निमकर, रमेश चांदुरकर, अ. म. पुरी, प्रशांत काळे, सुभाष पवार, नरेंद्र कांडलकर, विजय जवंजाळ, जगदीशराव हाडोळे, धीरज काळे, मधूकरराव मेन आणि प्रशांत तिखिले गुरुजन उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना गुरुजनांनी सांगितले की,

> “विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवावा, हेच आमचं खऱ्या अर्थाने यश आहे.”

 

माजी विद्यार्थ्यांनीही शालेय दिवसांच्या आठवणींना उजाळा देत आपले अनुभव कथन केले. संमेलनानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी संघाचे श्रीकांत वाघ, श्रीकांत नाथे, निलेश बाळे, दीपक जैस्वाल, रोशन फुलारी, श्रीकांत बोरकर, प्रशांत बोरकर, मंगेश टिके, रुपेश गोखे, श्रीकांत जुनगरे, लक्ष्मीकांत पराये, किशोर सोरमारे, सचिन फिसके, अल्पेश मंडलिक, प्रिया इंगोले (केदार), मयुरी कवाळे (पराये), वृषाली दाते (लोकरे), स्नेहा आजनकर (कविटकर), अनुरुपा बहादुरे (लोखंडे), सविता अपतूरकर (सरोदे), कल्पना चिरडे (रेखाते), मीना इंगोले (सुने), मीना सिनकर (नेमाडे), वृषाली येऊल (धुळे), लीना कावलकर (मेन), अश्विनी धोत्रे (पिंगे), योगिता म्हस्के (मेन), अश्विनी परातकर (मंडवे), रंजना मुळे (तायडे), रोहिणी कंटाळे (लवटे), रुपाली अंबाडकर (मुरतकर), प्रीती श्रीवास्तव, नलिनी शेवाने (मोकलकर) तसेच सर्व सदस्य आणि शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.