पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे बेवारस दुचाकी वाहनांचा जाहीर लिलाव – २५ वाहनांचा समावेश

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे अनेक वर्षांपासून जमा असलेली बेवारस, क्षतिग्रस्त आणि भंगार दुचाकीजाहीर लिलाव दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता पोलीस स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आला आहे.
हा लिलाव मा. पोलीस उपविभागीय अधिकारी, दर्यापूर यांच्या आदेशान्वये पार पडणार असून, एकूण २५ वाहनांचा या लिलावात समावेश आहे. सर्व वाहने परीक्षण व निरीक्षणासाठी पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.
लिलावाशी संबंधित अटी-शर्ती व वाहनांची सविस्तर यादी पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यवसायिकांनी कायदेशीर भंगार दुकान परवाना, GST क्रमांक, आधार कार्ड व PAN कार्ड या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
तसेच लिलावात सहभागी होण्यासाठी ₹५०,०००/- (पन्नास हजार रुपये) अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागेल. ही रक्कम २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत पोलीस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे स्वीकारली जाणार आहे.
सदर वाहने फक्त भंगार म्हणूनच विक्रीसाठी आहेत व ती कोणत्याही प्रकारे भविष्यात वापरासाठी अयोग्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. लिलावातील वाहनांचे इंजिन व चेसिस क्रमांक घासून अथवा खोडून टाकण्याची जबाबदारी खरेदीदाराची राहील.
लिलाव प्रक्रिया कोणत्याही कारणाशिवाय रद्द अथवा पुढे ढकलण्याचा अधिकार या कार्यालयाकडे असल्याचे पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी सांगितले.

