महत्वाचे

दर्यापूर नगर परिषद आरक्षण सोडतीने नेत्यांचे गणित बिघडले

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) दर्यापूर : नगर परिषद निवडणुकीतील आरक्षण सोडतीत तब्बल २५ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव ठरल्याने दर्यापूरच्या प्रस्थापित पुरुष नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक इच्छुकांची स्वप्ने धुळीस मिळाली असून आता त्यांना घरातील महिलांना पुढे करावे लागत आहे.

शासकीय सेवेत असलेल्या महिलांना निवडणूक लढवता न येत असल्याने काही नेत्यांची अडचण वाढली आहे. यामुळे दर्यापूरमध्ये चर्चांना उधाण आले असून अनेक पुरुष इच्छुक नाराज आहेत. मात्र या आरक्षणामुळे राजकीय घराण्यांतील नव्या महिला नेतृत्वाचा उदय होताना दिसत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.