गणेश नगरात नित्य काकड आरतीचा भक्तिभावाने समारोप

अंजनगाव सुर्जी (तालुका प्रतिनिधी – सचिन इंगळे):
अंजनगाव सुर्जी शहरातील गणेश नगर येथील श्री संकटमोचन हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्रारंभ झालेल्या नित्य काकड आरतीचा समारोप कार्तिक देवउठनी एकादशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.
सकाळी लवकर झालेल्या काकड आरती व प्रभातफेरीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला होता. मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते, तर रांगोळीने परिसर उजळून निघाला. मृदंग–टाळांच्या गजरात दीपप्रज्वलन, भजन-कीर्तन आणि हनुमान चालीसा पठणाने वातावरण मंगलमय झाले. “जय श्रीराम” व “पवनसुत हनुमानजी की जय” या जयघोषांनी वातावरण दुमदुमले.
स्थानिक महिला मंडळे, युवक मंडळे तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला. आरतीनंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. भक्तांनी उत्साहात महाप्रसादाचा लाभ घेतला.
मंदिर समितीच्या कार्यकर्त्यांनी भक्तांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. त्यानंतर सदस्यांनी सायंकाळी अचलपूर येथील कार्तिक स्वामी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या धार्मिक उपक्रमामुळे गणेश नगर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि एकतेचा संदेश पसरला.
या प्रसंगी श्री. ज्ञानदेव पारे, विजयभाऊ गुहे, राजूभाऊ इसाने, गजाननभाऊ मुधोळकर, आशिषभाऊ चोपडे, अंकुशभाऊ गुहे, अरुणभाऊ काळे, गोपालभाऊ पारे, पवनभाऊ गावंडे, ऋषिकेशभाऊ राऊत, जितूभाऊ गावंडे, एकनाथभाऊ पंचवटे, आयुष पारे, हर्षल राऊत, अथर्व चोपडे, देवेश तळोकार, अर्णव चौखंडे, श्रीरंग वाघमारे, कृष्णा चांदुरकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

