महत्वाचे

गावंडगाव बु येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे थाटात उदघाटन

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील गावंडगाव बु येथे नव्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या दवाखान्याचा शुभारंभ गावाचे सरपंच सुनील थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.

या सोहळ्याला उपसरपंच सौ. अपर्णा मोहन देशमुख, डॉ. प्रकाश भदे, प्रशांत थोरात, सौ. ममता गव्हाळे, सौ. गंगा मारोती घुगे, धनराज गावंडे, प्रशांत मधे, जयश्री गजानन फसाले, ममता दीपक गव्हाळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुळात या दवाखान्याचे उदघाटन खासदार बळवंत वानखडे व आमदार गजानन लवटे यांच्या हस्ते होणार होते. मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सरपंच सुनील थोरात यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

या दवाखान्याच्या उभारणीसाठी बाळासाहेब हिंगणीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मत सरपंच सुनील थोरात यांनी व्यक्त केले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.