महत्वाचे

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दमदार तयारी – प्रदीप येवले

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : “जातपातीवर नव्हे तर स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख राजकारणावर आमचा भर असेल,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रदीप येवले यांनी केले. अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत पक्ष नगराध्यक्ष पदासह सर्व २८ नगरसेवक पदांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रदीप येवले म्हणाले की, “शहराचा सर्वांगीण विकास हा आमचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, हे आमचे ध्येय आहे. स्वच्छ शहर, सुंदर शहर ही आमची संकल्पना असून रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा याबरोबरच शहरात भव्य क्रीडांगण, आधुनिक व सुव्यवस्थित शाळा, सुंदर बगीचे उभारण्याचा आमचा संकल्प आहे. तसेच घरकुल धारकांना प्राधान्य देण्याचा आमचा निर्धार आहे.”

यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप येवले यांच्यासह मोहम्मद फईमोद्दीन, अफसर बेग, मीनाताई कोल्हे, आचलताई इंगळे, सुनंदाताई सरोदे, रिझवान खान, आबीद पहेलवान, अनिल इंगळे, साधनाताई कोकाटे, निलेश शिरोळे, शेख अमिन, वाजिद मसूरी, राजेश तायडे, विनोद सरदार तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.