पथ्रोट येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा कृषि कर्ज मेळावा; 12 कोटींचे कर्जवाटप

अमरावती : सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे पथ्रोट येथे आयोजित कृषि कर्ज वितरण मेळाव्यात तब्बल 12 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान उपसरपंच अतुल वाठ यांनी भूषविले.
मेळाव्याला सेंट्रल ऑफिसचे महाप्रबंधक डॉ. भास्कर, अमरावती क्षेत्रिय प्रमुख सुनील पांडे, अचलपूरचे गटविकास अधिकारी सुधीर अरबाट आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. भास्कर यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना विविध कृषि कर्जाचे वितरण करण्यात आले तसेच बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मेळाव्यात क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक दीपक दाबोले, राजकुमार तरते यांनी कृषि कर्ज, कोल्ड स्टोरेज, पोल्ट्री फार्म, फूड प्रोसेसिंग, किसान व्हेईकल, पीएम-कुसुम, कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड, बचतगट कर्ज योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे यांनी केले. निलेश मुंडेकर यांनी सूत्रसंचालन तर अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार प्रदर्शन केले.

