योग आणि समाजसेवेत उल्लेखनीय कार्याबद्दल संगीता मेण यांचा सन्मान

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी : पंतजली योग समिती, अमरावती यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय इंटीग्रेटेड योगा शिबिरात समाजसेविका आणि पंतजली महिला योग समितीच्या जिल्हा संघटन मंत्री संगीता गोविंद मेण यांना योग व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान मुख्य केंद्रीय युवा प्रभारी स्वामी परमार्थ देवजी महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी स्वामी परमार्थ देवजी महाराज यांनी “योग हाच जीवन आहे” या विषयावर मार्गदर्शन करताना, योगाच्या माध्यमातून मानसिक आणि शारीरिक आरोग्य साध्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला आ. रवी राणा, खा. अनिल बोंडे, उद्योजक लप्पीशेठ जजोदीया, अशोक मुदंडा, प्रजापिता ब्रह्मकुमारी दिदी, गुरूदेव सेवा मंडळ, शिवगुरूद्वारा गुरु, संजवनी दिदी, मायादीदी यांसह विविध सामाजिक, आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी पंतजली योग समिती तसेच लोकजागर परिवाराने संगीता गोविंद मेण यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

