क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

महापालिकेत सामूहिक रजा आंदोलन; कामकाज प्रभावित, नागरिक त्रस्त

दोन अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करा, महापालिका आणि पोलिस आयुक्तांना भेटले शिष्टमंडळ

अमरावती : महानगरपालिकेतील अग्निशमन विभागातील दोन अधिकाऱ्यांचे नियमबाह्य निलंबन झाल्याप्रकरणी सोमवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करून हे निलंबन रद्द करण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे मुख्यालयासह पाचही झोन कार्यालयातील दैनंदिन कामकाज प्रभावित झाले होते. पुन्हा मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी हे आंदोलन सुरू राहील, असा पवित्रा कर्मचारी-कामगार संघाने घेतला आहे. दरम्यान अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द करावे, यासाठी आयुक्त सौम्या शर्मा चांडक आणि पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची शिष्टमंडळाने भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले, हे विशेष.

अग्निशमनच्या बडनेरा येथे कार्यरत केंद्र प्रमुख राजेश मोहन (५०) यांनी अधीक्षकासह तीन अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी अग्निशमन अधीक्षकासह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच महापालिका प्रशासनाने लक्ष्मण पावडे आणि संतोष केंद्रे यांना निलंबित केले. या कारवाईच्या विरोधात महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारून या नियमबाह्य कारवाईचा विरोध केला.

राजेश मोहन त्यांच्या पत्नी शीतल यांनी तक्रारीतील आरोपानुसार अधीक्षक संतोष केंद्रे आणि इतर तिघांनी मानसिक छळ केल्यामुळे पतीने आत्महत्या केली. तिनही कर्मचाऱ्यांनी त्यांना मानसिक त्रास दिला. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर २१ नोव्हेंबरला प्रशासनाने अभियंता लक्ष्मण पावडे आणि फायरमन संतोष केंद्रे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली आहे.

आंदोलनादरम्यान अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पीठे, लेखापरीक्षण अधिकारी श्यामसुंदर देव, लेखाधिकारी दत्तात्रेय फिस्के, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शहर अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता श्रीरंग तायडे, नंदकिशोर तिखिले, आर.आर. तांबेकर, प्रकाश मेश्राम, कृष्णा पारधी, संदीप रामेकर, प्रल्हाद कोतवाल, भूषण पुसतकर, विवेक देशमुख, प्रमोद इंगोले, शरद तिनखेडे, नितीन बोबडे, धनंजय शिंदे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

आज पुन्हा सामूहिक रजा आंदोलन

अधिकाऱ्याच्या निलंबनाविरोधात पुकारलेले सामूहिक रजा आंदोलन मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी कायम राहणार आहे, अशी माहिती महानगरपालिका कर्मचारी कामगार संघाचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांनी दिली. मुख्यालयासह पाचही झोन कार्यालयातील कामकाज बंद राहणार आहे

अशा आहेत प्रमुख मागण्या

सोमवारी कर्मचारी संघाकडून सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार २१ नोव्हेंबर रोजीच्या निलंबनाचा आदेश रद्द करावा, दोघांच्या जामिनासाठी होणारा खर्च महापालिका प्रशासनाने द्यावा आणि आरोपपत्र दाखल करण्याबाबत पोलिसांकडून परवानगी मागण्यात येईल, पण ही परवानगी देऊ नये, अशा मागण्यांचा समावेश आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.