क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
Trending

भाड्याच्या खोलीत बंगालींकडून भरविला जात होता जुगार अड्डा

अमरावती : नागपुरी गेट पोलिसांनी पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी असलेल्या आरोपींकडून अलीमनगर येथे भाड्याच्या खोलीत चालविल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर धाड घातली. २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ती कारवाई करण्यात आली. तेथून १९३० रुपये रोख व ताशपत्ते जप्त केले. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी अंमलदार राजेंद्र पिंपळे यांच्या तक्रारीवरून जुगारी रज्जाक मुल्ला (३९), नियामत गाझी (३८), मयदूल मंडल मजीद मंडल (३५) व गैसोद्दीन मोंडोल मकसूद मोंडोल (३०) या चौघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. चौघेही जुगारी पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. ते येथील अलीम नगर व अकबर नगर येथे भाड्याने राहत आहेत, तथा भाड्याच्या घरात जुगार अड्डा चालवत होते.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.