महाराष्ट्र

अमरावतीच्या रणांगणात आज जनतेची परीक्षा; ३.१२ लाख मतदारांच्या बोटांवर ९ पालिका व २ नगरपंचायतींचे भविष्य!

अमरावती : लोकशाहीचा महासण मंगळवारी जिल्ह्यात दणक्यात साजरा होत आहे. ९ नगरपरिषदां व २ नगरपंचायतींसाठी मतपर्वाची पहाट उजडताच ३६६ मतदान केंद्रांवर निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. तब्बल ३.१२ लाख मतदार आज आपल्या हक्काच्या मताने स्थानिक स्वराज्य संस्थांचे भवितव्य ठरवणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी ६४ आणि सदस्यपदासाठी तब्बल १०४८ उमेदवारांचे राजकीय भाग्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

सोमवार दुपारी मतदान पथके केंद्राकडे रवाना झाली आणि संध्याकाळी सूर्य मावळतानाच जिल्ह्यातील प्रत्येक गल्ली–बोळात उद्याच्या मतदानाची एक वेगळीच धडधड जाणवत होती. सायंकाळी ५.३० नंतर पडदा खाली येणार असला तरी बुधवारी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होताच विजयी गुलाल उडण्याच्या प्रतीक्षेत सारा जिल्हा आहे.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.