वरूड-पांढूर्णा महामार्गवरील टोलवर युवा मित्र मंडळचे टोल मुक्ती आंदोलन

वरुड-पांढूर्णा महामार्गावरील पुसलानजीकचा टोल नाका सुरु झाल्यामुळे वाहनचालकांना अगदी कमी अंतरासाठीही टोल द्यावा लागतो.यामध्ये स्थानिक वाहनधारक नागरिकांना, शेतकऱ्यांना, गावकऱ्यांना भुदंड सोसावा लागत आहे.
त्यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या असंतोषाचा बांध फुटला आणि टोल नाक्यावर युवा मित्र मंडळ, पुसला अध्यक्ष सुरज धर्मे यांच्या नेतृत्वात नागरिकांच्यावतीने पुसला टोल नाक्यावर मंगळवारी आंदोलन छेडण्यात आले. यामुळे महामार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली होती.
वाहतूक सुरळीत करण्याकरिता पोलीस प्रशासनाने सुरज धर्मे, विजय श्रीराव, विजय वडस्कर, जावेद शेख, अमर इवनाते, प्रमोद पाटील, धिरज सावरकर, कमलेश खपरीये यांना अटक करून काही वेळाने सुटका करण्यात आली.
मागण्यापूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असे नागरिकांनी मध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळाले.

