ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

ठाकरेंना लूजर्स म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्युत्तर; निकाल लागल्यानंतरही राजकीय धुरळा थांबेना!

निवडणुका संपल्या निकाल लागले परंतु राजकीय नेते एकमेकांवर लूज स्टॉक करायचं काही थांबवताना दिसत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंना लूजर्स म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही शिवसेना आणि मनसे नेत्यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले पाहुयात एक रिपोर्ट.महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केली.  मराठी अस्तिमेच्या मुद्द्यावरुन दोन्ही भावांनी संयुक्त सभांमधून राळ उठवली. निकाल लागल्यानंतर राजकीय धुरळा थांबेल असं वाटत असताना पुन्हा एकदा नव्याने टीका टिप्पणी सुरु झालीये. निवडणुक प्रचारादरम्यान ठाकरे ब्रँडचा बँड वाजवू अशी आरोळी भाजपकडून दिली जात होती. त्यातच निवडणुकीत ठाकरेंच्या पराभवानंतर मुख्यमंत्री फडणविसांनी राज ठाकरे यांना लुजर्स म्हणत डिवचलंय.

संजय राऊत जरी मनसेला लुजर मानत नसले तरी अगदी काल पर्वापर्यंत राज ठाकरेंच्या मनसेत असणाऱ्या आणि आता भाजपमध्ये गेलेल्या संतोष धुरींनी मनसेच्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंना जबाबदार धरलंय. तसच मनसेचा फायदा शिवसेना युबीटीला झाला मात्र मनसेचं नुकसान झाल्याचंही म्हटलंय.

आता ठाकरेंचा विषय आहे आणि नारायण राणे बोलले नाहीत असं होणं तर शक्यच नाही.. राणेंनीही मुंबईतल्या पराभवावरुन दोन्ही ठाकरेंना डिवचलंय.. वेगळ्याने लढले काय किंवा एकत्र लढले काय दोन्ही ठाकरे निष्प्रभ असल्याचं राणे म्हणालयेत.

दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर गेल्या निवडणुकीत एकट्याने लढलेल्या मनसेचा परफॉर्मन्स सुधरेल असा एक अंदाज वर्तवला जात होता. पण मनसेचं मात्र गेल्या वेळेसच्या तुलनेत सुद्धा एका जागेचं नुकसान झालं. कारण मनसेच्या नगरसेवकांचा आकडा हा 7 वरुन 6 वर आलाय. त्यामुळे जितकी चर्चा भाजपच्या विजयाची आहे तितकची राज ठाकरेंच्या या पराभवाचीही आहे. बाकी लुजर कोण आणि विनर कोण याचं उत्तर मुंबईकरांनी दिलेलच आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.