महत्वाचे

नागपूर-पुणे; नागपूर-हडपसर विशेष रेल्वे सोमवारी

मध्य रेल्वेकडून दिवाळी सणानिमित्त विशेष रेल्वे

अमरावती : दिवाळी सणानिमित्त गावी आलेल्यांना आता परतीचे वेध लागले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे विभागाने सोमवार, २७ ऑक्टोबरला नागपूर-पुणे आणि नागपूर-हडपसर विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्र. ०१४०२ नागपूर-पुणे विशेष ही गाडी नागपूर येथून ४ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. तसेच गाडी क्र. ०१२०१ नागपूर – हडपसर ही विशेष गाडी नागपूर येथून ७ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा,मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगावा मनमाड, कोपरगाव, बेलापूर अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन येथे थांबणार आहे. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, तेरा शयनयान चार सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.