ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

नवी मुंबई नेरूळच्या सेक्टर १६ A मध्ये रंगांचा जल्लोष; कोळीवाडा मित्र मंडळाचा उत्सव दणक्यात

 

नवी मुंबई नेरूळ (प्रतिनिधी) : नवी मुंबई सेक्टर १६, A नेरूळ येथे कोळीवाडा मित्र मंडळाच्या पुढाकारातून रंगोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिक, युवक आणि लहानग्यांनी एकत्र येत रंगांच्या उधळणीत बंधुभावाचा संदेश दिला. ढोल-ताशांच्या गजरात आणि रंगांच्या वर्षावात परिसर अक्षरशः न्हाऊन निघाला.
या उत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका रूपाली ताई भगत (मुंबई महानगरपालिका नवी मुंबई ) उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते रंगोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी समाजातील ऐक्य, सौहार्द आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “अशा उपक्रमांमुळे समाजातील तरुण पिढी सकारात्मक दिशेने वाटचाल करते,” असे त्या म्हणाल्या.
यावेळी समाजसेवक गणेश दादा भगत, सामाजिक कार्यकर्ते रवि दादा भगत आणि किस्मत नाना भगत यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमात टायगर ग्रुप नेरूळचे तालुका अध्यक्ष संदिप दादा कुमार यांनी युवकांना एकत्र येऊन समाजकार्यात सक्रिय राहण्याचे आवाहन केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सिंह राजपुत, समाजसेवक सागर भगवत कांबळे, आतिश संजय चव्हाण, आगोरी फाउंडेशन नेरूळचे सहयोग नितीन गायकवाड यांनीही रंगोत्सवात सहभाग नोंदवत उत्साह वाढवला.
युवकांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळेच चैतन्य लाभले. नाविण्य भगत, खुशविर सिंह, श्रोक नंदन भगत, अनश सागर कांबळे, साजन डबल पालकी, कत्तली यांच्यासह अनेक तरुणांनी रंगांची उधळण करत मैत्री आणि एकतेचा संदेश दिला.
संपूर्ण परिसरात सुरक्षिततेची आणि शिस्तीची विशेष काळजी घेण्यात आली होती. महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पारंपरिक संगीत, नृत्य आणि सामूहिक स्नेहभोजनामुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.
एकंदरीत, कोळीवाडा मित्र मंडळाच्या या रंगोत्सवाने नेरूळच्या सेक्टर १६ मध्ये सामाजिक सलोखा, एकजूट आणि आनंदाचा नवा रंग भरला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.