ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र
Trending

मेळघाटात बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात वन्यजिवांचा थरार

विभागीय निहाय मचाण संख्या अकोट : ६४, सिपना : ५५, गुगामल : ५२, पांढरकवडा : ४७, अकोला : २५, मेळघाट वन्यजीव : २१.

परतवाडा : बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा ‘निसर्ग अनुभव’ उपक्रम यंदा अविस्मरणीय ठरला. १ मे २०२६ रोजी रात्रीच्या वेळी मेळघाटातील २६४ मचाणांवरून निसर्गप्रेमींनी १२ तास वन्यजीवांचा थरार अनुभवला. यावेळी वाघ, बिबट्या आणि अस्वलासह अनेक दुर्मीळ वन्यजीवांनी पाणवठ्यावर हजेरी लावून पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या या उपक्रमाला यंदा निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गुगामल, अकोट, सिपना, मेळघाट (प्रादेशिक), पांढरकवडा आणि अकोला विभागांतील पाणवठ्यांवर मचाण उभारण्यात आले होते. गुगामलमध्ये ५२, अकोटमध्ये ६४, सिपना ५५, मेळघाट वन्यजीव २१, अकोला २५ आणि पांढरकवडा विभागात ४७मचाणांवर पर्यटकांनी रात्रभर वास्तव्य करून निसर्गाचा जवळून अनुभव घेतला.

 

राज्याबाहेरूनही निसर्गप्रेमींची मांदियाळी

या उपक्रमासाठी ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ अमरावतीच नव्हे, तर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, यवतमाळ, परभणी, वाशीम, बुलढाणा आणि नांदेड या जिल्ह्यांतून पर्यटक आले होते. विशेष म्हणजे, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतूनही मोठ्या संख्येने निसर्गप्रेमींनी मेळघाटात हजेरी लावली होती. वन्यजीवांचे मनमोहक दर्शन रात्रीच्या वेळी जंगलातील गूढ शांतता, हवेची झुळूक आणि अचानक पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणारे वन्यप्राणी हा अनुभव पर्यटकांच्या अंगावर रोमांच उभा करणारा होता.

हे बघायला मिळाले प्रत्यक्ष वन्यप्राणी

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ३० वाघ, १६ बिबट, ११० अस्वल, ४१३ रानगवा, ८५६ सांबर, १२१ नीलगाय आदी प्राणी प्रत्यक्षात बघायला मिळाले. तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पअंतर्गत येत असलेल्या पांढरकवडा वन्यजीव विभागात ३ वाघ, २ बिबट, १६४ रानडुक्कर, २५ अस्वल, ६७ नीलगाय, १५३ चितळ व अकोला वन्यजीव विभागात १६ बिबट, २५ अस्वल, २ तडस, २३ कोल्हा, ६० रानडुक्कर, २०२ चितळ व ३६५ नीलगाय आदी प्राणी प्रत्यक्षात बघायला मिळाले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.