टेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रसांस्कृतिक

अचलपूरमध्ये विद्यार्थी सत्कार सोहळा; 500 हून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव

 

अचलपूर | प्रतिनिधी :
स्वामी विवेकानंद विचार मंच बहुउद्देशीय संस्था, अचलपूर आणि भागवताचार्य पंडित नंदकिशोर शर्मा सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ९ जुलै रोजी राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त महावीर भवन, टक्कर चौक येथे भव्य विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

४३ गावांतील ८४६ विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

संस्थेचे अध्यक्ष पंडित गजानन शर्मा यांनी सांगितले की, यावर्षी अचलपूर परिसरातील ४३ गावांतील एकूण ८४६ विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली होती. कार्यक्रमात १७६ विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह (मोमेंटो) तर ३४० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच पर्यावरण मंत्रालय, भारत सरकारच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीचे सदस्य जयपूरकर सर होते. प्रमुख वक्ते म्हणून भाजप महाराष्ट्रचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी उपस्थित होते. अचलपूरच्या नगराध्यक्षा सौ. रुपाली अभय माथने यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच भारतमाता आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ₹११ हजारांचे पारितोषिक

समारंभात सर्वाधिक गुण प्राप्त करणारा विद्यार्थी रणविजय चित्रकार याला स्व. बुधरामजी भवरीलालजी शर्मा यांच्या स्मरणार्थ बाबूजी केटरिंग व महालक्ष्मी केटरिंग (चेतन शर्मा व रोहन शर्मा) यांच्या वतीने ₹११,००० रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला गजानन कोल्हे (भाजप ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष), सुधीर भाऊ रसे, रूपेश ढेपे, तुषार भाऊ खेरडे, विनिता ताई धर्मा, अक्षय पखाले, सुनील ठाकरे, अनिकेत मिश्रा, कचरुलाल पटवारी, डॉ. हर्षद मडघे, रवी गुप्ता, हिना कुरेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर माकोडे यांनी केले. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष पंडित गजानन शर्मा यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम साऊरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्टेलर अकॅडमी, पुष्पांजली मेडिकल्स, लायन्स क्लब अचलपूर तसेच विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थाध्यक्ष पंडित गजानन शर्मा यांनी सर्व सहकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.