क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

सुखदेवानंदच्या माजी प्राचार्याने विद्यार्थिनीच्या प्रवेशासाठी मागितली लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

हिंगोली : दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनीने प्रवेशासाठी ऑनलाईनव्दारे अर्ज भरल्यानंतर भांडेगाव येथील सुखदेवानंद विद्यालयात प्रवेश घेण्याबाबत मोबाईलवर संदेश आला होता. प्रवेशासाठी १३३२ रुपयाच्या अतिरिक्त रक्कमेची लाचेची मागणी सुखदेवानंद कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय भांडेगावचे माजी प्राचार्य प्रकाश निरगुडे यांच्यावर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.

या  प्रकरणी लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, भांडेगावातील एका विद्यार्थिनीने फेबु्वारी २०२५ मध्ये दहावीची परीक्षा दिल्याने ती उत्तीर्ण झाली होती. पुढील शिक्षणाकरीता तिने प्रवेशासाठी ऑनलाईनव्दारे अर्ज दाखल केल्यानंतर सदर विद्यार्थिनीला भांडेगावातील सुखवादेवानंद विद्यालयात प्रवेश मिळणार असा संदेश तक्रारदाराच्या मोबाईलवर आला होता.

 

१ जुलैला तक्रारदार सुखदेवानंद विद्यालय भांडेगाव येथे मुलीच्या प्रवेशासाठी बोलाविल्याने ते गेले असता विद्यालयाचे माजी प्राचार्य व सध्याच्या संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य प्रकाश चक्रधर निरगुडे व तक्रारदाराची भेट झाली. या दरम्यान मुलीला ११ वीमध्ये प्रवेश द्यावयाचा असल्यास ३ हजार रुपये द्यावे लागतील तर आमच्या महाविद्यालयात तिचा प्रवेश करू असे माजी प्राचार्य प्रकाश निरगुडे यांनी सांगुन ३ हजार रुपये न दिल्यास प्रवेश मिळणार नाही असे ठासुन सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने २ जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता पंच व साक्षिदारा समवेत तक्रारीची पडताळणी केली. त्यात प्रकाश निरगुडे यांनी ३ हजाराच्या लाचेची मागणी केली.

यावेळी तक्रार दाराने रक्कम कमी करण्याची विनंती केली असता प्रकाश निरगुंडे यांनी दोन हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्विकारण्यास सहमती दर्शविली. तक्रारदाराच्या मुलीला ११ वी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी शासकीय नियमानुसार ६६८ रुपये प्रवेश फी असताना प्रकाश निरगुडे यांनी अयोग्य रित्या व अप्रमाणिकपणे आपले कर्तव्य करून तक्रारदाराकडून पंचा समक्ष २ हजार रुपयाची मागणी केली.

ज्यामध्ये १३३२ रुपयाची अतिरिक्त रक्कमेची मागणी निरगुडे यांनी केल्याचे तक्रार पडताळणीत निष्पन्न झाल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात माजी प्राचार्य प्रकाश चक्रधर निरगुडे यांच्यावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधिक्षक संदिप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार, पोलिस उपाअधिक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, राजाराम फुफाटे, रविंद्र वरणे, वाघ, विनोद पुंडगे, शेख अकबर यांच्या पथकाने केली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.