ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अमरावती जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान महिलेसह तिघे पाण्यात बुडाले

गणेश विसर्जनासाठी गेलेले तीन भाविक विविध ठिकाणी पाण्यात बुडाले होते. यामध्ये एका महिलेसह दोन तरुणांचा समावेश आहे.

अमरावती : जिल्ह्यात गणेश विसर्जनासाठी गेलेले तीन भाविक विविध ठिकाणी पाण्यात बुडाले होते. यामध्ये एका महिलेसह दोन तरुणांचा समावेश आहे. यापैकी दोघांचा मृतदेह सापडला असून, एकाचा शोध सुरू आहे. या घटना दर्यापूर, धामणगाव रेल्वे आणि मेळघाटातील धुलघाट रेल्वे येथे शनिवारी घडल्या आहेत.

दर्यापुरात चंद्रभागा नदीत बुडाली महिला : दर्यापूरलगतच्या बनोसा येथील मुक्ता साहेबराव श्रीनाथ (३२) असे मुतक महिलेचे नाव आहे. शनिवारी मुक्ता श्रीनाथ या गणपती विसर्जनाकरिता भावासोबत चंद्रभागेच्या तीरावर गेल्या असताना पाय घसरून खाली पडल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्या पाण्यात बुडाल्या. त्यांना तातडीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर बाहेर काढून दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं‌ या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बगाजी धरण ‘टाकीत युवकाचा मृत्यू : धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली येथील करण अमोल चव्हाण (२२) या तरुणाचा धनोडी गावालगत असलेल्या वरुड बगाजी धरणाच्या टाक्यात बुडून मृत्यू झाला आहे. करण हा शनिवारी (दि. ६) त्याच्या कुटूंबियांसह वरुड बग्गाजी धरणाजवळील पाण्याच्या टाकीजवळ गणपती विसर्जनासाठी गेला होता. विसर्जनावेळी अंघोळ करत असताना पाण्याच्या टाकीत बुडून तो मरण पावला. या प्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.