महाराष्ट्र

पांढरी (खानमपूर) येथे शिवजयंती उत्साहात साजरी; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पांढरी (खानमपूर) गावात देशभक्ती, प्रेरणा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात शिवचरित्राचे स्मरण, अभिवादन व विविध सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण शिवमय झाले होते. गावातील नागरिकांनी एकत्र येत महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच स्वराज्याच्या आदर्शांचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाच्या आयोजनात गोविंद हाडोळे, पुरूषोत्तम नेटकर, सुनील चोपकार, अतुल तुरखडे, शंतनु कोकाटे, शिवा रोघे, पवन गोबरे, निखिल कोकाटे, अविनाश इंगळे, योगेश डाबरे, रुपेश तायडे, मिलिद पाटील, राम वसुले, डॉ. देशमुख, तेजस भेले, आदित्य भेले, हरिभाऊ भेले, ऋषिकेश गोबरे, अशोक मसने, गौरव मसणे, प्रज्वल मसने, अभिनव हाडोळे, प्रशांत चोपकार, रोशन चोपकार, शेषराव धुळे, दर्शन बोडखे, पुष्पक येऊल, रमेश काळे, बबलु इंगळे, पवन रायबोले, निखिल गोबरे, कृष्णा गोबरे, काळे भाऊ, शंकर येवले, गोलूभाऊ तुरखडे, डाबरे भाऊ, विशाल आमले, मनोज लांडे, वैभव हाडोळे, मनीष हाडोळे, पंकज पवार, दिगंबर पवार, कार्तिक हरसुलकर, प्रणिल पवार, गोपाल धारपवार, आशिष कान्हेरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

यावेळी उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी धोरणांचा गौरव करत तरुणांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान देशभक्तीपर घोषणा, शिवगर्जना आणि प्रेरणादायी भाषणांनी वातावरण दुमदुमून गेले. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून स्वाभिमान, एकता आणि राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी दिवस असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडला. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.