ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

जीवे मारण्याची धमकी दिल्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

सेनगाव : तालुक्यातील जयपूर येथील एका तरुणाने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने व पिकअपचे नुकसान केल्याने लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 26 मे रोजी घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील छत्रगुण गजानन सावसुंदर (वय 20 वर्ष) यास आरोपी भरत कुंडलिक पोपळघट रा. जयपूर ता. सेनगाव) याने दोघांमध्ये घेतलेल्या पिकअप च्या भाड्याचे हिशोब न दिल्याने व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने तसेच दुसरा आरोपी अनिल पांडुरंग आहेर रा. जयपूर ता. सेनगाव यांनी पिकअप वाकडे -तिकडे चालवून पिकअप रोडच्या खाली घालून पिकअपचे नुकसान केल्याने शत्रुघन गजानन सावसुंदर याने जयपुर शिवारातील गट क्रमांक 189 मध्ये लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी भरत गजानन सावसुंदर वय 24 वर्षे व्यवसाय शेती रा. जयपूर ता. सेनगाव यांच्या फिर्यादीवरून नमूद आरोपीं विरुद्ध   सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी एस. बी. स्वामी व सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.बी. घारगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे हे करत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.