१२ वी बेसबॉल राष्ट्रीय फेडरेशन कप दि. ७ ते १० जून २०२५ अमरावतीत
अमरावती : महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन व अमरावती जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या यजमानपदा खाली १२ वी राष्ट्रीय बेसबॉल फेडरेशन कपचे आयोजन ७ ते १० जून पर्यंत अमरावतीत करण्यात आले आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ४०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक अमरावतीत येत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मैदानात होणाऱ्या १२व्या राष्ट्रीय स्पर्धेत ३७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा, संगरूर, पंजाब येथे उपांत्य फेरीत आलेले ८ टॉप संघ त्यामध्ये यजमान महाराष्ट्र,मध्यप्रदेश, पंजाब, दिल्ली, केरळ, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड हे पुरुषांचे , तर पंजाब, दिल्ली, यजमान महाराष्ट्र, केरळ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, चंदीगड, ओडिशा हे महिलांचे संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेनिमीत्त संपूर्ण भारतातून सुमारे ४०० हून अधिक राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, पंच अमरावतीत येत आहे. या स्पर्धेसाठी यजमान अमरावती मध्ये महाराष्ट्र संघाचे सराव शिबीर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मैदानावर सुरु झाले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन 8 तारखेला सायंकाळी 5.00 वाजता मा.खा.श्री. बळवंत वानखडे यांच्या हस्ते माजी पालकमंत्री अॕड्. यशोमती ठाकूर, ऑम्युचुअर बेसबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. डी.डी. गर्ग, महासचिव अरविंदकुमार व खजीनदार एस. व्यंकटेश यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र बेसबॉल असोसीएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण 10 तारखेला सायंकाळी 4:00 वाजता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डॉ. तनुजा राऊत, महाराष्ट्र बेसबॉल संधटनेचे सचिव श्री. राजेंद्र इखनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या संघामध्ये यावर्षीचे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेडाळू श्री प्रदीप पाटील, रेखा धनगर यांच्या सह महाराष्ट्रचे आंतरराष्ट्रीय खेळाडू नंदन परब, ऋषीकेश राऊळ, संतोष कचरे, ज्योती पवार, आरती भगत, विद्या गिरी, रिया आगवणे, रितु फ्रांसीस या खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेकरीता महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव व अखिल भारतीय बेसबॉल फिडरेशनचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राजेंद्र इखणकर, स्पर्धेचे आयोजक सचिव व महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष इंद्रजित नितनवार, खजिनदार दिपेन वाळके सहसचिव, मकरंद कोऱ्हाळकर, तांत्रिक समिती प्रमुख अशोक सरोदे, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक संतोष खेंडे, पंचप्रमुख चरणजित सिंग, आयोजक अमरावती जिल्हा बेसबॉल संघटनेचे प्रा. डॉ. सुनिलकुमार, शरद गढीकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व खेळाडू प्रयत्न करीत आहेत.

