ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्रशिक्षण

“जहाँ से उम्मीदें पंख लगाती हैं…”, एआयद्वारे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकानं बनवला रॅप साँग

 

 

 

अमरावती : एखादं गाणं लिहिलं की, संगीतबद्ध तसंच लयबद्ध करणं… या प्रक्रियेसाठी स्टुडिओ, गायक, संगीतकार असं सगळं लागतं. मात्र, या सर्वांना फाटा देत आपल्या मोबाईल फोनवरच आपल्या कल्पनेतील रॅप साँग व्हिडिओ बनवला आहे. अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या दाभा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकानं उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पुन्हा शाळा सुरू होणार म्हणून शाळेचं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करणारा एक खास व्हिडिओ बनवला आहे. विशेष म्हणजे एआय तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या रॅप साँग व्हिडिओची शिक्षण क्षेत्रात चांगलीच चर्चा होत आहे. एआयद्वारे रॅप साँग व्हिडीओ बनवणाऱ्या शिक्षकांचं नाव अंकुश गावंडे असं आहे. विज्ञानाशी खेळत शाळेत विद्यार्थी हिताचे अनेक प्रयोग करणाऱ्या अंकुश गावंडे यांच्या या नव्या आणि खास उपक्रमसंदर्भात “ईटीव्ही भारत” चा हा स्पेशल रिपोर्ट…

…जादूचा प्रयोग असाच अनुभव : “सतत प्रयोगशील विचार डोक्यात चालू असताना हातात मोबाईल फोनवर उपलब्ध असणाऱ्या एआय तंत्रज्ञानामध्ये नेमकी काय जादू दडली आहे. याची उत्सुकतेपोटी चाचपणी केली. शेअरचॅट या एआय ॲपमध्ये आपल्या कल्पनेतील विषयांचे काही शब्द नमूद केले. तर एक छानसं गाणं, त्यात रचलं जातं हे माझा लक्षात आलं. या गाण्याला चाल देण्यासह त्याला गाण्याचं स्वरूप देण्यासाठी आणखी एक नवं एआय ॲप असते, याची माहिती शेअरचॅट या ॲपमुळचं कळलं आणि ते ॲप पटकन डाउनलोड केलं. एआय तंत्रज्ञानानं रचलेल्या गाण्याचे बोल या नव्या ॲपमध्ये पेस्ट करताच हे गाणं पुरुष की महिला अशा कोणाच्या आवाजात हवं, असं विचारण्यात आलं. पुरुषाच्या आवाजात हवं अशी सूचना दिल्यावर या गाण्याला कोण-कोणत्या वाद्यांचं संगीत हवं, असं विचारणारा संदेश आला. तबला, पेटी, बासरी पासून सर्व आधुनिक वाड्यांची यादी समोर आली. त्यापैकी मी काही वाद्य निवडली आणि त्यानंतर अगदी क्षणात छान संगीत आणि सुरेख आवाजासह गाणं तयार होतं, हे लक्षात आलं. हा मोबाईल फोनवरचा खेळ जणू जादूचा प्रयोग असाच अनुभव होता,” असं अंकुश गावंडे यांनी “ईटीव्ही भारत”शी बोलताना सांगितलं.

Zilla Parishad school teacher made a rap song video using AI

गाण्यातून विविध माहिती : दरम्यान, अंकुश गावंडे या शिक्षकानं रचलेल्या रॅप साँगच्या व्हिडिओत दाभा येथील जिल्हा परिषदेची शाळा, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शेतातील उपक्रम, शाळेला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचा सीईओ यांनी दिलेली भेट, शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल अशी विविध माहिती आहे.

Zilla Parishad school teacher made a rap song video using AI
असं आहे गाणं…
जहाँ से उम्मीदें पंख लगाती हैं,
दाभा की मिट्टी नई राह दिखाती है।
जिल्हा परिषद स्कूल हमारा अभिमान,
ज्ञान, संस्कार से चमके यह स्थान.

पीएमश्री का सुंदर सपना,
शिक्षा में हो तकनीक का अपना वचना।
हर बच्चा यहाँ बने नायक महान,
शिक्षा का मंदिर – हमारा विद्यालय प्रधान।

दाभा विद्यालय – प्रेरणा की बात,
हर कोने में चमके नवाचार की बात।
कंप्यूटर लॅब और जिओग्राफी की उड़ान,
ज्ञान की दुनिया में ले जाए हर छात्र महान।
मुख्यमंत्री स्पर्धा में प्रथम स्थान,
“सुंदर शाळा” बनी हम सबकी जान।
दाभा स्कूल – आधुनिक पहचान,
गांव में गूंजे इसका सम्मान।

आधुनिक तंत्रज्ञान व सुविधाएँ
अलेक्सा से होती स्मार्ट बात,
व्हिआर और एआर दिखाएं नयी बात
आयसिटी से सज्ज है हर कक्षा,
साइंस में होता रोज़ नव प्रयोग सच्चा।

कम्प्युटर लॅब में बच्चे हैं तेज,
जिओग्राफी लॅब से समझें धरती की रेख।
स्मार्ट क्लासेस, ग्लोबल व्हिजन, सीबीएससी पैटर्न से बने फ्युचर मिशन
जिल्हाधिकारी ने की तारीफ यहाँ,
सीईओ ने कहा – “यह है शिक्षा की शान।”
मान्यवर अधिकारी जब स्कूल आए,
हर दीवार, हर बच्चा मुस्काए।

साफ-सफाई, रंग-बिरंगी कक्षा,
बालमैत्री, संस्कारों की भाषा।
उपक्रम, प्रयोग, शाळेचा जयघोष,
दाभा शाळा दे देश को जोश!

दाभा विद्यालय हर घर की शान,
बच्चों के सपनों की बने उड़ान।
प्रतिभाओं की यहाँ होती पहचान,
नव भारत के निर्माण की जान।

आओ मिलकर कहें यह बात
“दाभा शाळा” सबसे खास।
ज्ञान, विज्ञान, संस्कार की धार,
हमारी शाळा – गांव का सितार!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं आकर्षण : “ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढावी, यासाठी शाळेत अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. माझ्या या रॅप साँग व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या दाभा गावातील विद्यार्थांना आपली शाळा देखील इतर शाळांच्या स्पर्धेत मागे नाही, असा संदेश देणारा आहे. यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या रॅप साँगचा वापर करत तयार केलेल्या व्हिडिओचे विद्यार्थ्यांमध्ये आकर्षण आहे. तसंच, शाळेच्या संपूर्ण वैशिष्टाची नोंद या व्हिडिओमध्ये घेण्यात आली आहे,” असं अंकुश गावंडे यांनी सांगितलं.

एआयद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाढणार शिक्षणाची आवड : “खरंतर हा व्हिडिओ मी बनवला, त्याचवेळी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पुस्तकातील कवितांना असा एआय टच दिला तर विद्यार्थ्यांमध्ये या कविता शिकण्याची आवड निर्माण होईल. पुस्तकात दडून असलेलं ज्ञान एआय तंत्रज्ञानाद्वारे साधं, सोपं आणि मुलांना आवडेल, अशा पद्धतीनं त्यांना समजवण्याचा प्रयोग या नवीन शिक्षणिक वर्षात केले जातील,” असं अंकुश गावंडे म्हणाले.

अंकुश गावंडे यांचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून… : एआय तंत्रज्ञानाचा वापर करत अगदी सहज छानसा व्हिडिओ तयार करणारे अंकुश गावंडे हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या आर्णी गावातील रहिवासी आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण आर्णी येथील जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी घेतली असून डीएड दारवा येथून केलं. यानंतर बीएड वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ येथून केलं आहे.

27 पुरस्कारांचे मानकरी : 20023-24 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीनं विविध विषयांच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत अंकुश गावंडे यांनी जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकाचे चार, तृतीय क्रमांकाचा एक, तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे पाच, द्वितीय क्रमांकाचे आठ आणि तृतीय क्रमांकाचे नऊ असे एकूण 27 पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात विक्रम नोंदवला.

वाइल्ड ग्रीन प्रोजेक्ट : रोमेनिया देशातील शिक्षिका कोरिना सुजदिया यांच्या सहकार्यानं अंकुश गावंडे हे “वर्ल्ड वाइल्ड ग्रीन प्रोजेक्ट” हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प राबवित आहेत. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृकता निर्माण करून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचं महत्त्व निर्माण करणं, असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विविध आंतरराष्ट्रीय दिवस, विविध देशातील शिक्षणिक व सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यासाठी अनेक उपक्रम देखील राबविले जातात. या उपक्रमात 50 देशातील शिक्षक आणि हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

Zilla Parishad school teacher made a rap song video using AI
इनोव्हेटिव्ह, ग्लोबल टीचर अशी ख्याती : शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या अंकुश गावंडे यांना शैक्षणिक संशोधनासाठी न्यूझीलंडमधील क्विव्हर आणि अमेरिकेतील थ्री डीबियर हा संस्थांनी सन्मानित केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबल आणि इनोव्हेटिव्ह टीचर म्हणून अंकुश गावंडे यांची ख्याती आहे.
शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.