टेक्नॉलजीताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचे

मुंबई लोकल मेगा ब्लॉक : आज मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, असं आहे रेल्वेचं वेळापत्रक

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ या स्थानकांदरम्यान आज रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

मुंबई – लोकल ट्रेन मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेननं प्रवास करतात. रेल्वेच्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे 30 लाख मुंबईकर लोकल ट्रेनने प्रवास करतात. याच कारणामुळे उपनगरीय वाहतुकीला मुंबईकरांची जीवनवाहिनी देखील म्हटलं जातं. यामुळे लोकलचा मेंटेनन्स ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं काम असतं. या तांत्रिक कामांसाठी दर रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला जातो. मध्य रेल्वेनं या रविवारी (२२ जून) देखील तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. अशा स्थितीत मुंबईकरांनी रविवारी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.

माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन स्लो ट्रॅकवर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत– मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी माटुंगा ते मुलुंड या मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धिम्या ट्रॅकवर सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे, हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:15 पासून ते सायंकाळी 4:15 मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं मध्य रेल्वं म्हटलं आहे.

तसेच, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्थानकावरून, सकाळी 10:14 ते सायंकाळी 4:32 पर्यंत सुटणाऱ्या डाउन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे या गाड्या आपल्या नियोजित वेळेनुसार 15 मिनिटांच्या उशिरानं धावणार आहेत.

 

तर दुसरीकडे ठाण्याहून सकाळी 11:07 ते दुपारी 3:51 पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जाणार असून, या लोकल मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. पुढे पुन्हा माटुंगा स्थानकावर अप धिम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यामुळे लोकल आपल्या नियोजित स्थानकांवर नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिरानं पोहोचतील, अशी माहितीही मध्य रेल्वेनं दिली आहे.

नेरूळ ते मानखुर्द मार्गावरही मेगा ब्लॉक – मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर देखील नेरूळ ते मानखुर्द दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 11:18 ते दुपारी 3:28 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी 10:37 ते दुपारी 3:45 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील, असंही मध्य रेल्वेनं सांगितलं आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.