ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

स्वारगेट बस स्थानकाजवळ पोलीस आणि गांजा तस्करामध्ये थरार; घटना सीसीटीव्हीत कैद!

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाजवळ दिवसाढवळ्या अंमली पदार्थांची तस्करी करणारा तरूण आणि पोलिसांमध्ये थरार पाहायला मिळाला.

पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाजवळ दिवसाढवळ्या अंमली पदार्थांची तस्करी करणारा तरूण आणि पोलिसांमध्ये थरार पाहायला मिळाला. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. स्वारगेट पोलिसांकडून पाठलाग करत या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली. यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगार टोळीच्याच मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे.

या प्रकरणी पोलिसांनी नितीन नरसिंह पाल (वय-23), अल्ताफ ईलाई तांबोळी (वय-28) आणि विठ्ठल ऊर्फ दादा हरी शिवपाल (वय-31) यांना अटक केली असून आरोपींकडून एकूण एक लाख एकवीस हजार रुपये किंमतीचा 6 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तसंच याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली गाडी आणि आरोपींचे जप्त मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या की, “19 जून रोजी एक सडपातळ इसम, दाढी राखलेली, मानेवर इंग्रजीमध्ये टॅट्यू काढलेला, डोक्यावर काळी टोपी, काळी पॅन्ट घातलेला हा वेळापूर येथे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी स्वारगेट एसटी स्टॅण्ड येथे उभा आहे. त्याच्या हातात चॉकलेटी कलरची बॅग असून त्या बॅगमध्ये गांजासारखा अंमली पदार्थ आहे, अशी खबर मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावून स्वारगेट बस स्टॅन्ड येथे पोलीस पथकाला पाठवलं होतं.”

 

दरम्यान, “स्वारगेट बस स्टॅन्डवर पोलीस पथकानं संबंधित व्यक्तीला बॅगबाबत विचारणा करताच तो बॅग सोडून पळू लागला. त्यावेळी त्याला पोलीस अंमलदार राहुल होळकर, नवनाथ शिंदे व स्वारगेट बस स्थानक डयुटीवरचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांनी पाठलाग करुन शिताफीनं पकडलं. त्याच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता त्यात गांजासारखा अंमली पदार्थ आढळला. यानंतर त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्याने आणखी दोन साथीदार हे माल विक्रीसाठी पुण्यात आल्याचं सांगितलं. यानंतर त्या दोघांनाही अटक केली असून अधिक तपास सुरू आहे,” असंही पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितलं.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.