ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

दलाई लामांना बनारस हिंदू विद्यापीठाकडून ६९ वर्षानंतर दुसऱ्यांदा डी. लिट प्रदान, कारण काय?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना त्यांच्या ९० व्या वाढदिवशी बनारस हिंदू विद्यापीठानं डी. लिट ही पदवी प्रदान केली. ६९ वर्षानंतर पुन्हा विद्यापीठानं कशामुळे पदवी दिली?

वाराणसी (लखनौ)- बनारस हिंदू विद्यापीठानं बौद्ध गुरु दलाई लामा यांना ९० व्या वाढदिवसानिमित्त खास भेट दिली आहे. विद्यापीठानं दलाई लामा यांना ६९ वर्षांनंतर पुन्हा एकदा डॉक्टर ऑफ लेटर्स (डी लिट) ही पदवी प्रदान केली आहे. बीएचयूचे कार्यवाहक कुलगुरू संजय कुमार यांनी संयुक्त रजिस्ट्रार तिबेटी संस्थेकडं पदवी समर्पित केली. ही पदवी आता हिमाचलमधील धर्मशाळेच्या संग्रहालयात ठेवली जाणार आहे.

बौद्ध गुरु दलाई लामा यांनी १९५६ मध्ये बीएचयूमधून (BHU) डॉक्टर ऑफ लेटर्सची पदवी घेतली होती. त्यावेळी चीननं ताबा न घेतल्यानं तिबेट स्वतंत्र होता. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे दलाई लामा यांनी १९५९ मध्ये तिबेट सोडून भारतात राजाश्रय घेतला. तेव्हापासून दलाई लामा हे धर्मशाळेत राहताता. मात्र, त्यांची पदवी तिबेटमधीच राहिल्यानं केवळ पदवीचा फोटो धर्मशाळेत ठेवण्यात आला आहे. ही माहिती सेंट्रल तिबिटीयन इन्स्टिट्यूटचे रजिस्ट्रार यांना माहिती झाल्यानंतर त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठाशी संपर्क केला. त्यांनी विद्यापीठाकडे पदवीची दुसरी प्रत द्यावी, अशी मागणी केली. त्यावर विद्यापीठ प्रशासनानं दुसरी प्रत देण्याचा मागणी मान्य केली. ६९ वर्षांनंतर विद्यापीठ प्रशासनानं दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे ६ जुलैला पदवीची दुसरी प्रत जारी केली. ही दुसरी प्रत तिबेटीयन इन्स्टिट्यूटला देण्यात आली. त्यामुळे तिबेटच्या वस्तू संग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांना दलाई लामांना मिळालेल्या पदवीची सत्यप्रत पाहता येणार आहे.

 

पदवीचा होता केवळ एक फोटो- सेंट्रल हायर तिबेटीयन इन्स्टिट्यूटच्या रजिस्ट्रार डॉ. सुनीता चंद्रा म्हणाल्या, “दलाई लामा ट्रस्टनं धर्मशाळेत वस्तुसंग्रहालय स्थापन केलं आहे. या संग्रहालयात त्यांच्या सर्व वस्तू जतन केल्या आहेत. परंतु त्यामध्ये डी. एल. पदवीचा फक्त एक फोटो होता. मात्र, मूळ पदवी उपलब्ध नव्हती. संग्रहालयाच्या संचालकांशी झालेल्या संभाषणादरम्यान दलाई लामा यांची पदवी तिबेटमध्येच राहिली असल्याची माहिती कळाली. आम्ही बीएचयूच्या संयुक्त रजिस्ट्रारशी संपर्क साधला. त्यानंतर, पदवीची दुसरी प्रत देण्याची प्रक्रिया सुरू झाली.”

 

जगभरातील पर्यटकांना पाहता येणार पदवी- पुढे सुनिती चंद्रा म्हणाल्या, ” विद्यापीठानं सर्व प्रशासकीय प्रक्रिया केल्यानंतर कुलगुरू प्रोफेसर संजय कुमार यांनी दलाई लामा यांना त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त ही मानद पदवी पुन्हा प्रदान केली आहे. ही पदवी धर्मशाळेच्या संग्रहालयाची शोभा वाढविणार आहे.जगभरातील दलाईल लामा यांच्या अनुयायांना आणि संशोधकांना पदवी पाहता येईल. तसेच त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता येईल.”

कोण आहेत दलाई लामा : दलाई लामा हे तिबेटी लोकांचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु आहेत. ते हिमाचलमधील धर्मशाळेच्या बौद्ध मठात राहतात. करुणा, दया आणि बौद्ध धर्माच्या मुलभूत विचारांचा प्रसार यामुळे जगभरात त्यांच्याकडं आदरानं पाहिलं जातं. दलाई लामांच्या शिकवणीमुळे त्यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.