ताज्या घडामोडीदेश विदेशफॅशनमहत्वाचे

ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर चर्चेची विरोधकांची लोकसभेत मागणी, 12 वाजेपर्यंत कामकाज स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी ऑपरेशन सिंदूरसह विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली– संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. विरोधकांचा गोंधळ होत असल्यानं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं आहे.

पावसाळी अधिवेशन उत्सवाचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.”ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं आपल लक्ष्य गाठलं आहे. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना घुसून मारलं आहे. भारतीय सैन्यशक्तीची संपूर्ण जगानं ताकद पाहिली आहे.”

संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले, “संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांचं स्वागत आहे. देशातील हवामान खूप चांगले प्रगती करत आहे. शेतीबद्दल फायदेशीर बातम्या येत आहेत. गेल्या १० वर्षांत निर्माण झालेल्या जलसाठ्यात जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.”

आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर प्रथमच भारताचा तिरंगा ध्वज फडकणं हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे यशस्वी प्रवास आहे. भारताला अंतराळात नवीन उंचीवर नेण्यासाठी भविष्यातील कार्यक्रमांसाठी त्यामधून प्रेरणा मिळणार आहे-पंतप्रधान, नरेंद्र मोदी

 

सुरक्षा दलाची नवीन आत्मविश्वासानं वाटचाल- पुढे पंतप्रधान म्हणाले, “पावसाळी अधिवेशन हा विजयोत्सव आहे. संपूर्ण जगानं देशाच्या सैन्यदलाचं सामर्थ्य पाहिलं आहे. सैन्यदलानं ऑपरेशन सिंदरमध्ये निश्चित केलेलं लक्ष्य 100 टक्के पूर्ण केलं आहे. दहशतवाद्यांच्या प्रमुखाच्या घरी जाऊन सैन्यदलानं 22 मिनिटांत कारवाई केली. देश दहशतवाद आणि नक्षलवाद अशा अनेक प्रकारच्या हिंसाचाराचा बळी ठरला आहे. नक्षलवाद आणि माओवादाची व्याप्ती खूप कमी होत आहे. माओवादाचे उच्चाटन केल्यानंतर देशातील सुरक्षा दल नवीन आत्मविश्वासानं वेगानं यशाकडे वाटचाल करत आहेत. देशातील शेकडो जिल्हे नक्षलवादापासून मुक्त झाले आहे. हे जिल्हे स्वातंत्र्याचा श्वास घेत आहेत.”

सर्व गोष्टी खूप गंभीर- पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचं पहिलेच सत्र आहे, असे शिवसेनेच्या (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी सांगत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी मान्य न झाल्यानं नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “या पावसाळी अधिवेशनात सर्व गोष्टींवर चर्चा केली जाईल. गुप्तचर यंत्रणेतील अपयश, पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना का अटक करण्यात आली नाही? तयार केलेले रेखाचित्र त्यांच्याशी का जुळलं नाही? या सर्व गोष्टी खूप गंभीर आहेत. यासोबतच, इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर अधिवेशनात चर्चा करता येईल.

काँग्रेस खासदारांची स्थगन नोटीस- पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी राज्यसभेत नियम 267 अंतर्गत काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. काँग्रेसच्या खासदार बी. मणिकम टागोर, काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांनीदेखील नियम 267 अंतर्गत स्थगन सूचना दिली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी बिहारमधील निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेमुळे उद्भवलेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी नियम 267 अंतर्गत सभागृह तहकूब करण्याची सूचना दिली आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.