ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

ग्राहक बनून आलेल्या बुरखाधारी महिलेने महालक्ष्मी ज्वेलर्समधून ३.८४ लाखांचे दागिने पळवले

अमरावती : शहरातील राजकमल चौक ते अंबादेवी मार्गावरील एका ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून गेलेल्या महिलेने ३ लाख ८४ हजार ५९३ रुपयांचे दागिने लंपास केले. हा प्रकार शनिवार, १९ जुलै रोजी घडला आहे. या प्रकरणी दुकान मालकाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

गौरव राजकुमार कोटवानी (३६, रा. शंकरनगर, अमरावती) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. गौरव कोटवानी यांचे राजकमल चौक ते अंबादेवी मार्गावर महालक्ष्मी ज्वेलर्स आहे. या ज्वेलर्समध्ये शनिवारी दुपारी अंदाजे ४० ते ५० वय असलेली काळ्या रंगाचा बुरखा घालून एक महिला आली. या दुकानातील सेल्सगर्लला तिने मंगळसूत्रामधील पेंडंट मागितले. सेल्सगर्लने तिला सोन्याचे वेगवेगळे पेंडंट दाखवले.

याचदरम्यान बुरखाधारी महिलेने सेल्सगर्लचे लक्ष विचलित करून दाखवलेल्या पेंडंटपैकी २२ कॅरेटचे २५.२१० ग्रॅम आणि दुसरे १५.८९० ग्रॅमचे असे दोन पेंडंट एकूण ४१ ग्रॅम किंमत ३ लाख ८४ हजार ५९३ रुपयांचे हातचलाखी करून चोरून नेले आहे. पेंडंट चोरी गेल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी लक्षात आला. त्यावेळी दुकान मालक गौरव कोटवानी यांनी कोतवाली पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात बुरखाधारी महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.