ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

राजकुमार पटेल यांचा टोला मी वनवासात नाही तर जनतेच्या सहवासात

जिप, पंस, नपं निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा संकल्प

धारणी दि.२१ प्रतिनिधी

माझ्या विरोधकांनी राजकुमार आता अज्ञातवासात गेला, वनवासीत पोहचला किंवा राजकारणापासून अलिप्त झाला, अशा अफवा पसरविलेल्या आहेत. मात्र, मी वनवासात गेले नाही तर जनतेच्या सहवासातच आहे, असा टोला माजी आमदार राजकुमार पटेल यांनी लावल्याने सध्या मेळघाटचे : राजकारण ढवळून निघालेले आहे. रविवारी धारणीत समर्थकांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पटेलांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. धारणीत २० जुलै रोजी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला.

 

याप्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांना व समर्थकांना स्थानिक स्वराज्य संसीच्या निवडणूकीत पूर्ण ताकदीने लढण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमात मंचकावर प्रकाश घाडगे, माजी जिप उपाध्यक्ष जयप्रकाश पटेल, कृऊबासचे सभापती रोहितकुमार पटेल, कालु मालवीय, अलताफ डोसानी, शोएब मेमन, रामलाल मावस्कर, गणपत गायन, अॅड. सुभाष मनवर, देविदास कोगे विराजमान होते. विधान सभा निवडणूकी नंतर प्रथमच पटेल समर्थकांनी सभेचे आयोजन करून आपसात विचार विमर्श केल्याने भाजप, काँग्रेस व शिवसेनेत खळबळ माजलेली आहे. शिंदे सेना, राकाँ, भाजपा व कॉग्रेसकडून धारणी नपं, जिप निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांना संघटीत करणे तथा इनकमिंग सुरू झालेली असताना राजकुमार पटेलांची आजची सभा राजकारणात परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. अनेक वक्त्त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर राजकुमार पटेलांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विरोधकांवर सरळ हल्ला चढवला. मी वनवसात गेलो नव्हतो, मी तर जनतेच्या सहवासातच आहे. जनतेसाठी राजकुमार हमेशा तैयार है, अशी सिंहगर्जना त्यांनी केली. सोमवारी चिखलदरा येथे सभा आयोजित असून कार्यकर्त्यांसोबत पटेल विचार विमर्श करणार आहेत. संचालन रोहित पटेल तर आभार प्रदर्शन देविदास यांनी केले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.