क्राइमताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

स्पा मालक मुंबई- पुण्याचे अन् मॅनेजर युपीचा; मुली परप्रांतिय

नोटीस देणार : मनपाही कळविणार; स्पामध्ये आढळला नाही परवाना

अमरावती : राजापेठ ते बडनेरा रोडस्थित एका मॉलमधील युनिकार्न स्पामध्ये मसाजआड चालविल्या जाणाऱ्या देहविक्रीच्या अनैतिक धंद्याचा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ने रविवारी (दि. २०) सायंकाळी पर्दाफाश केला. तेथून देहविक्री करणाऱ्या सहा तरुणींना ताब्यात घेतले. तथा तेथील मॅनेजरला राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारी पहाटे दोन स्पामालक व मॅनेजर अशा तिघांविरुद्ध पिटान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आता स्पामालक सोमेश्वर रावते (रा. मुंबई) व वैभव नांदरम (रा. पुणे) यांना राजापेठ पोलिसांकडून चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस पाठविली जाणार आहे.

तिसऱ्या माळ्यावरील युनिकार्न स्पा येथे मसाजआड देहविक्रीचा व्यवसायाचा भंडाफोड करण्यासाठी रविवारी (दि. २०) सायंकाळी बनावटी ग्राहक पाठविण्यात आला. तेथे धाड घातली असता एक युगूल आक्षेपार्ह स्थितीत आढळले, तर अन्य एका खोलीत एक ग्राहक मसाज करवून घेताना आढळला. ते दोघेही  ग्राहक यवतमाळ येथील होते. त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काउंटरवरील मॅनेजरजवळून १.०९ लाख रोख रकमेसह एकूण १.४४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्या स्पामध्ये असलेल्या सहा तरुणींचा आरोपी मॅनेजर संजय राजपूत (२४, पिसनारी, उत्तरप्रदेश) हा देह व्यापाराच्या व्यवसायाकरिता वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले. मसाजनंतरच्या विशेष सर्व्हिससाठी दररोज २५ ते ३० ग्राहक येत होते, अशी माहिती समोर आली आहे. धाडीदरम्यान परवाना असल्याचे मॅनेजरने सांगितले. मात्र ते पोलिसांना पुरवू शकले नाहीत. त्या स्पाचा परवाना रद्दचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

 

नांदेड, मुंबईच्याही मुली रविवारी ज्या सहा तरुणी तेथे आढळल्या, त्यातील प्रत्येकी दोन नांदेड व मुंबईच्या, एक उत्तर प्रदेशची तर एक तरुणी ही बिहारहून आल्याचे स्पष्ट झाले. आपण तीन ते चार महिन्यांपूर्वीच येथे आलो असल्याची व येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये राहत असल्याची कबुली त्या तरुणींनी दिली.

 

 

आता पुढील कारवाई राजापेठ पोलिस करतील. मसाजआड उघड झालेला देहविक्रीचा प्रकार हा ‘ह्युमन ट्रैफिकिंग’चाच प्रकार आहे.

संदीप चव्हाण, प्रमुख, गुन्हे शाखा -२

..असा आहे आरोप

स्पाच्या चालक-मालकांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याकरिता राज्यातून व राज्याबाहेरून मुली बोलावल्या. त्यांना पैशाचे प्रलोभन दाखवून देहव्यापारास प्रवृत्त केले. तथा त्याकरिता जागा उपलब्ध करून देत त्यांच्याकडून बॉडी मसाजच्या नावाखाली अवैध देहव्यापार करून घेतला. चारही आरोपींचे कृत्य अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ प्रमाणे होत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.