तोशल पाटील यांची ‘रोहित पवार फाऊंडेशन’ अमरावती जिल्हा कार्यध्यक्षपदी नियुक्ती

अमरावती : राजकारणात सामाजिक कार्याच्या माध्यमातून ठसा उमटवणाऱ्या रोहित पवार फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेने अचलपूर येथील युवक तोशल पाटील चित्रकार यांची अमरावती जिल्हा कार्यध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवराज जयंत वाकोडे (विदर्भ प्रभारी, रोहित पवार फाऊंडेशन झ महाराष्ट्र राज्य, तसेच जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमरावती ग्रामीण) यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या अधिकृतनियुक्तीपत्रात म्हटले आहे की, आपलेरोहित दादा पवार यांच्यावर असलेली निष्ठा व आपले सामाजिक आणि राजकीय कार्य पाहता, आपली अमरावती जिल्हा कार्यध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे, आपण रोहित पवार फाऊंडेशनचे काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य उत्कृष्ट रित्या पार पाडाल, अशी अपेक्षा आहे, असे शुभेच्छा संदेशात नमूद करण्यात आले आहे.
तोशल पाटील हे गेल्या काही वर्षांपासून अचलपूर परिसरात सामाजिक, कला व युवकांशी संबंधित विविध उपक्रमांत सक्रीय सहभाग घेत असून, त्यांच्या कायार्ला अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

