ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अचलपुरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

अचलपूर : कुटुंबीय नागपंचमीच्या यात्रेत गेल्याने घरी एकटा असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अचलपुरात ३० जुलै रोजी रात्री ही घटना घडली.

गजानन कैलास घोळकर (३८) असे मृताचे नाव आहे. तो अविवाहित होता तसेच मूर्ती बनविण्याचे काम करीत होता. मागील काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. बुधवारी रात्री कुटुंबीय नागपंचमीच्या यात्रेत गेल्यामुळे तो रात्री एकटाच घरी होता. रात्री १० च्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई-वडील व भाऊ, बहीण आहेत. शवविच्छेदनाकरिता मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केला. पुढील तपास अचलपूर पोलिस करीत आहेत.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.