ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

अंजनगाव सुर्जी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 

-सचिन इंगळे (प्रतिनिधी) अंजनगाव सुर्जी :येथील अण्णाभाऊ साठे नगरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथमच भव्य प्रांगणात सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये समाजातील सुशिक्षित व गुणवंत विद्यार्थ्यांचा आई वडिलांसह सत्कार करण्यात आला.याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा प्रेमकुमार बोके, खंजेरीवादक संदिपपाल महाराज, रामपाल महाराज,सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल गवई, युवा पत्रकार सचिन इंगळे, वक्ते हरीश फुटनाईक विजय रायबोले, पत्रकार तथा युवा प्रवक्ते मनोज मेळे,रमेश सावळे . नितेश वानखडे, पत्रकार प्रेमदास तायडे , सुनिल हिवराळे,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप देशमुख ,विलास गवई,प्रतीक्षा इंगळे,बाळासाहेब गौंडचोर, अब्दुल रहेमान, शंकरराव जोंधळेकर, माजी प्राचार्य लोखंडे सर, कलाने,शाहिल मोरे कव्वाल, इत्यादी मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला व नागरिकांना संबोधित केले.
याप्रसंगी अशोक जोंधळे,दिपक शेळके,अनिल शेळके, जगदिश गवई,गोपाल चव्हाण, पंकज सावळे, किशोर शेळके, देविदास मळसने, मनोज जोंधळे, पंकज हिरूळकर आनंद सरकटे,सह अनेक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल गवई यांनी केले. युवा पत्रकार सचिन इंगळे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.