ताज्या घडामोडीदेश विदेशमहत्वाचेमहाराष्ट्र

बसस्थानकात नाक दाबून बसायचं सर्व्हेत चार स्थानके पास

अमरावती : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यात सुरू असून, एसटी विभागाचे पथकांनी सर्वच बसस्थानकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. पहिल्या सर्वेक्षणात अमरावती विभागात परतवाडा बसस्थानकाने प्रथम क्रमांकात ‘ब’ मानांकन तर मोर्शीला द्वितीय ‘ब’ मानांकन मिळाले आहे. चिखलदरा व अंजनगाव सुजी बसस्थानकास ‘क’ मानांकन मिळाले.

 

असे मिळाले गुण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात सहकारी बसस्थानकांमध्ये एकूण १०० गुण दिले जातात. त्यामध्ये परतवाडा बसस्थानक प्रसाधनगृह २७

गुण, बसस्थानक व्यवस्थापन ४८, हरित बसस्थानकास २० असे शंभरपैकी २५ गुणांसह ‘ब’ मानांकन प्राप्त झाले आहे तर मोर्शी बसस्थानकाला प्रसाधनगृह २८, बसस्थानक व्यवस्थापनास ४४ आणि हरित बसस्थानकास १४ असे ८८ गुणासह ‘ब’ मानांकन प्राप्त झाले तर ‘क’ मानांकन प्राप्त बसस्थानकात चिखलदरा बसस्थानकाला बसस्थानक प्रसाधनगृह २९, बसस्थानक व्यवस्थापन ४८, आणि हरित बसस्थानकात १४ असे एकूण २१ गुणासह ‘क’ मानांकनात विभागात पहिला क्रमांक विभागात मिळाला आहे. तर अंजनगाव सुजी बसस्थानकाला बसस्थानक प्रसाधनगृह २६, बसस्थानक व्यवस्थापन ४२ आणि हरित बसस्थानकात २० पैकी १९ गुणांसह एकूण ८८ गुण मिळवत ‘क’ मानांकनात द्वितीय क्रमांक विभागात मिळाला आहे.

टॉप बसस्थानकांना कोट्यवधींची बक्षिसे शासनाने नेमलेल्या समितीकडून बसस्थानक परिसराची देखभाल व दुरूस्ती, शौचालयाची पाहणी स्थानकावरील स्वच्छता, एका दिवसातील प्रवासी संख्या, बसची देखभाल या बाबींचे निरीक्षण करून १०० पैकी गुण दिले जातात. त्यामध्ये ७० ते १०० चांगला तर ५० ते ७० मध्यम आणि ० ते ५० गैरसोयीला गुण दिले जातात.

 

परतवाडा, मोर्शी या बसस्थानकाला अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विभागात ‘ब’ मानांकन मिळाले आहे तर चिखलदरा आणि अंजनगाव सुजी बसस्थानकाला विभागात ‘क’ मानांकन मिळाले आहे.

– नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक

 

तपासणी समितीकडून पाहणी सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक आहे. का हे पाहण्यासाठी यावेळी प्रवाशांना सर्व सुविधा आहेत का नाही, याची पाहणी केली. दरम्यान, सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला.

दररोज हजारो प्रवाशांची जिल्ह्यात एसटीतून सफर एसटी महामंडळाच्या बसेसमधून दिवसाला हजारो प्रवासी प्रवास करतात. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक सवलतीसह राज्य सरकारच्या प्रवास सवलतीमुळे प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: या पोर्टल वरील बातम्या,लेख,फोटो,विडियो कॉपी करू नये.